वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इस्लामपूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून सरकारच्या विरोधी जणू रणशिंगच फुंकले

0

इस्लामपूर,प्रतिनिधी;

         हे राज्य सरकार शेतकरी व सामान्य माणसांच्या विरोधी आहे. सरकारने शेतकरी व सामान्य माणसाची थट्टा लावली असून त्यांनी ती बंद करावी,अन्यथा सरकारला क्रांतिकारी वाळवा तालुक्याच्या स्टाईलने हिसका दाखविला जाईल,असा सणसणीत इशारा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संग्रामदादा पाटील यांनी दिला. राज्यात कांदा पिकत असताना शत्रू राष्ट्र पाकिस्तानकडून कांदा आयात करणे,हा राष्ट्र द्रोह नाही काय?असा सवालही त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केला.

           वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इस्लामपूर तहसील कार्यालयावर एक जबरदस्त मोर्चा काढून सरकारच्या विरोधी जणू रणशिंगच फुंकले . प्रशासनाने मोर्चाचा इतका धसका घेतला की,त्यांनी मुख्य प्रवेशद्वार बंद करून घेतले. येथे येवूनच तहसीलदार नागेश पाटील यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील,युवक जिल्हाध्यक्ष भरत देशमुख,पंचायत समिती सभापती सचिन हुलवान, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायक पाटील,जिल्हा उपाध्यक्ष भीमराव पाटील,सरचिटणीस बाळासाहेब पाटील,माजी तालुकाध्यक्ष संजय पाटील, इस्लामपूर शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील यांच्यासह पदाधिकारी,व हजारो युवक या मोर्चात सहभागी झाले होते.

         संग्रामदादा पाटील यांनी आक्रमक शैलीत शासनावर चौफेर हल्ला चढविला. ते म्हणाले,येत्या दीड महिन्यात सोयाबीनला जाचक अटी रद्द करून रु.3500 चा हमी  भाव द्या. नाहीतर युवक राष्ट्रवादीच्या उग्र आंदोलनास सामोरे जावे लागेल. शेतकऱ्याच्या कोणत्याही शेती मालास हमी भाव दिला जात नाही. कर्ज माफीची घोषणा होवून सहा महिने झाले तरी आजू  शेतकऱ्याच्या हातात पैसे मिळालेले नाहीत. नोटा बंदी व जीएसटीने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. चांगलं पाऊस होवून धरणे भरली असतानाही 12-12 तास वीज बंद केली जात आहे. बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील दर 15 डिसेंबरला खड्डे मुक्त महाराष्ट्राची घोषणा करीत आहेत. आम्हाला लोकनेते राजारामबापू पाटील यांच्यापासून लोक आंदोलन व लढ्याची परंपरा आहे,याचे भान ठेवा.

Rate Card

          तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील म्हणाले, या मंडळीनी शेतकऱ्यांना शेती मालास खर्च व त्यावर 50 टक्के फायदा देवू,असे आश्वासन दिले होते. मात्र सध्या सर्व शेती मालाचे दर पडल्याने शेतकरी आहे. शासनाने शेतकरी व सामान्य माणसांच्या भावनांची योग्य वेळी दखल घ्यावी. जिल्हाध्यक्ष भरत देशमुख म्हणाले, हे सरकार लबाड आहे. वर्षाला 2 कोटी युवकांना नोकऱ्या देवू,असे सांगून हे सत्तेवर आले. गेल्या ३ वर्षात ६ कोटी युवकांना नोकऱ्या देणे राहिले बाजूला, लाखो युवकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. यावेळी विनायक पाटील,शहाजीबापू पाटील,संजय पाटील,आष्टा शहराध्यक्ष अनिल पाटील यांनीही सरकारवर तोफ डागत आंदोलनाचा इशारा दिला.

         सकाळी 10 वाजता जुन्या कचेरी चौकात छ.शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आबेडकर यांच्या पुतळ्यास अधिवादन करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. इस्लामपूर,आष्टा या शहरासह संपूर्ण वाळवा तालुक्यातून सहभागी झालेले हजारो युवक,व त्यांचा उत्साह हे मोर्चाचे विशेष वैशिष्ट्ये होते. या मोर्च्यांत सहभागी बैलगाडी व त्यात ठेवलेले सोयाबीनचे पोत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा भव्य मोर्चा गांधी चौक, आझाद चौक,झरी नाका,पंचायत समितीपासून नव्या प्रशासकीय कार्यालयात आला. माजी जि.प.अध्यक्ष देवराज पाटील,संचालक ए.टी.पाटील, आनंदराव पाटील,कार्तिक पाटील,विठ्ठलतात्या पाटील,दादासाहेब मोरे,जि.प.सदस्य धनाजी बिरमुळे,सुतगिरणीचे अध्यक्ष बबनराव थोटे,उपाध्यक्ष सुहासकाका पाटील,तुंगचे भास्करराव पाटील,बँकेचे संचालक विजयराव यादव,माणिक पाटील, संभाजी पाटील,तसेच उमेश पवार,आबासाहेब पाटील,विशाल सूर्यवंशी,जुबेर खाटीक, धीरज भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने युवक व पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो ओळी-इस्लामपूर येथे तहसीलदार नागेश पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन देताना युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्रामदादा पाटील,जिल्हाध्यक्ष भरत देशमुख,विजयबापू पाटील,विनायक पाटील,बाळासाहेब पाटील,संजय पाटील,शहाजीबापू पाटील,सभापती सचिन हुलवान व कार्यकर्ते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.