जत येथे स्वस्त औषधी सेवा जेनरिक मेडिकलचे उद्घाटन

0

जत,प्रतिनिधी : जत शहर व तालुक्यातील गोरगरिब व गरजू रुग्णांसाठी “जत स्वस्त औषधी सेवा” या जेनरिक मेडिकल स्टोअर्सचे उद्धाटन माजी मंत्री जंयत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी माजी सभापती सुरेश शिंदे, प्रसिध्द स्ञीरोग त डॉ. रविंद्र आरळी, दंतरोग तज्ञ डॉ. मदन बोर्गीकर,डॉ. मनोहर मोदी,डॉ. शरद पवार,डॉ. महेश पट्टणशेट्टी,डॉ. महेश भोसले, डॉ. सोनाली थोरात,आदि मान्यवर उपस्थित होते.

लोकाच्या आग्रहास्तव जत शहरातील संभाजी चौक येथे हे औषध दालन सुरू झाले आहे.  इतर नामवंत कंपन्याच्या तुलनेत 30-70टक्के स्वस्त दरात जेनरिक औषधे उपलब्धं आहेत.

Rate Card

डॉ. रविंद्र आरळी म्हणाले, जेनरिक व इतर कंपन्याचे मुळ औषध एकच आहे.नामाकिंत कंपन्या आपले ब्रँड विकत असल्यामुळे ती औषधे महाग असतात.विदाऊट ब्रँड शिवाय औषधाचा दर कमी असतो.हेच औषध सामान्य रुग्णांना परवडते.जेनरिक औषधाचाही वापर करावा, मनात शंका बाळगू नये,शासनाकडून अशा औषधाचा वापर वाढावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मनोहर मोदी,मदन बोर्गीकर यांनी मनोगत व्यक्त केले. जत तालुक्यातील जनतेसाठी हे दालन उघडले  आहे.याचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक अमृत कमसे यानी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.