नगरपालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊनही राजकीय पक्षात अद्याप शांतता

0
4

जत,प्रतिनिधी :नगरपालिका निवडणूक 

कार्यक्रम जाहीर होऊनही राजकीय पक्षात अद्याप शांतता आहे. नेमकी उमेदवारी निश्चित नसल्याने नगराध्यक्ष, नगरसेवक पदाचे इच्छूंक उमेदवारही थंड आहेत.जत तालुक्यातील सर्वात मोठे सत्ताकेंद्र असलेली नगरपालिका आपल्याच गटाच्या ताब्यात ठेवण्यासाठी शहरातील तिन प्रमुख पक्षांनी कंबर कसली आहे. पाच वर्षापुर्वी स्थापन झालेल्या नगरपालिकेची ही दुसरी पंचवार्षिक निवडणूक होत आहेत. गत निवडणुकीत मोठी आश्वासने देऊन सत्तेत बसलेल्या पदाधिकाऱ्यांनी किती विकास केला हा संशोधनाचा विषय असला तरीही पुन्हा नव्या निवडणूकीसाठी निवडून आलेले पदाधिकारी मैदानात उतरले आहेत. गत पाचवर्षात सत्तास्थानी पदाधिकाऱ्यांचे विकास कामापेक्षा पक्ष बदलाची चर्चा जोरात झाली. आता होत असलेल्या निवडणूकीत हे मुद्दे गाजणार आहेत.एकनिष्ठता, पक्ष ,गट,व नेतृत्वाला तिरांजली देत अनेक सदस्यांनी स्वता:चे हित जपल्याचे आरोप झाले. त्यामुळे यंदाची निवडणूक सर्वांना जड जाण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात उमेदवार निश्चित नसल्याने अद्याप सर्वाची तलवार म्यान आहे. मात्र प्रत्यक्षात पँनेल लागल्यानंतर पक्ष नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार आहेत. बंडोबाची धग याही निवडणूकीत परिणाम कारक असणार आहे.

चौकट : 

नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून भाजप नेते डॉ. रविंद्र आरळी यांच्या पत्नी डॉ. रेणूका आरळी यांचे नाव जवळपास निश्चित अाहे. कॉग्रेस कडून विद्यमान नगरसेवक शुंभागी बन्नेनावर, व माजी जिल्हा परिषद सदस्या मिनाक्षी अक्की यांच्यात स्पर्धा आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार अजून गुलदस्त्यात आहे. 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here