मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलच्या तिन विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत सुवर्ण

0

Rate Card

 अलकुड एस : स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आयोजित देवगड सिंधुदुर्ग येथे झालेल्या राजस्तरीय स्केटिंग स्पर्धेमध्ये मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत 3 गोल्ड मेडल व 1 सिल्वर मेडल मिळवले.विजयी विद्यार्थ्यांची नावे अपूर्वा नेताजी माने,सिद्धी सुनील पाटील,वेदांत संतोष बंडगर,वरद अरविंद भोसले या राज्यस्तरीय स्पर्धा होत्या तरी या चारही विद्यार्थ्याचे उत्तरप्रदेश मधील बनारस बरेली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.शाळेच्या या प्रारंभी मुलांनी मोठी भरारी घेतली आहे.भविष्यात याहूनही मोठी भरारी घेण्याचे बळ मुलांना देण्याचे काम शाळेतील शिक्षक करतील अशी सर्वांना निश्चित खात्री आहे.अल्पावधीतच नावलौकिकास आलेल्या मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे अलौकिक आहे,यासाठी शाळेतील शिक्षक प्रयत्न वाखण्याजोगे आहेत. हा विजय म्हणजे या प्रयत्नांचे यश आहे. असे चेअरमन मोहन माळी यांनी सांगितले. यशस्वी विद्यार्थ्यांना स्केटिंग शिक्षक अजित पाटील,क्रीडाशिक्षक अमर पाटील,मुख्याध्यापिका कविता मेहरा,चेअरमन मोहनमाळी,व्यवस्थापक सचिन चौगुले,सचिन कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन  लाभले

मोहन माळी इंटरनँशनल स्कूलचे यशस्वी विद्यार्थी विजयी ट्रापीसह 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.