राहते घर पेठवून अंपगाला जिंवत जाळण्याचा प्रयत्न : बालगाव मधील घटना ; बाहेरून कडी लावून घर पेठविले

0

उमदी, वार्ताहर:बांलगाव (ता.जत) येथील मळसिद्धा आमसिद्धा कांबळे (वय- 36) यांचे रहाते घर अज्ञातानी पेटवुन दिले.जुन्या वादातून हा प्रकार झाल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.जिंवत जाळण्याचा प्रयत्न केला.घटना सोमवारी पहाटे दोनच्या दरम्यान घडली.आमसिध्दा यांनी आरडाओरडा केल्याने सुदैवाने शेजारच्या नागरिक जागे होऊन त्यांना बाहेर काढल्याने त्यांचा जिव वाचला. मात्र घरात बांधलेल्या पाच शेळ्या आगित जळून मरण पावल्या आहेत. 

  याबाबत घटनास्थळ व उमदी पोलिसांकडून मिळालेली माहीती अशी की, उमदी विजापुर रोडवर असणाऱ्या बालगाव पासून एक किलो मीटर अंतरावर असणाऱ्या चोरीहाळ वस्ती येथे कांबळे कुटूबियांची शेती आहे. शेतीतच रस्त्याला लगत त्यांनी शेडवजा पत्रा चारी बाजुनी छप्पर बांधुन ते कुंटुबीयासह रहातात.काही दिवसापुर्वी तेथेच आमसिंध्दा खानावळ चालवत होता.महिन्यापुर्वी काही तरुणात जेवन देण्यावरून वाद झाला होता.ते प्रकरण पोलिसात गेले होते. तरूणांना अटक करून जामिनवर सोडले होते. त्यांनीच हल्ला केला असावा असासंशय आमसिंध्दा यांनी व्यक्त केला.आमसिंध्दा यांचे वडील आजारी असल्याने सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्यां सोबत नातेवाईक आहेत. मळसिध्दाच्या पत्नी,दोन मुले नातेवाईकाच्या विवाहासाठी बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे आमसिंध्दा एकटेच होते. रविवारी ता.13 रोजी रात्री 2 च्या सुमारास घरात मळसिद्धा कांबळे झोपले होते. अज्ञातानी त्याच्या घराच्या दरवाज्याला बाहेरच्या बाजूने कडी लावत छपरास आग लावून पलायन केले. आगीच्या ज्वाला लागल्याने मळसिद्धा यांना जाग आली ते जीवाच्या अकांताने ओरडू लागले. तोपर्यत आजुबाजू असणाऱ्या लोकांनी धाव घेऊन मळसिद्धा यांस घरातून बाहेर काढले त्यामुळे ते वाचले. मात्र  छप्परामध्ये बांधलेल्या 5 शेळ्या आगीत जळून खाक झाल्या.म्हैशीला कसेबसे वाचविण्यात यश आले. म्हैशीच्या मानेवर गंभीर भाजले आहे.आगीत संसार उपयोगी साहीत्य ज्वारी, बाजरी ,टिव्ही,पीटाची गिरण असा सुमारे दोन लाखाचे साहीत्य जळून खाक झाले. या घटनेची माहीती मळसिद्धा यांने उमदी पोलिसांना कळवली. उमदी पोलिस ठाण्याचे सपोनि भगवान शिंदे , उपनिरिक्षक प्रविण संपागे यांनी आपल्या फौजफाट्यासह घटना स्थळी धाव घेऊन पहाणी केली. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलिस अधिकारी नागनाथ वाकुडे व तहसिलदार अभिजित पाटील यांना सपोनि भगवान शिंदे यांनी कळवले असता त्यांनी देखील घटनास्थळी पहाणी करुन तातडीने तपास करण़्याचे आदेश दिले व शासकिय मदतीची आश्वासन दिले. 

Rate Card

      जळीत घटनेसंबंधी घटनास्थळी ऊलट सुलट चर्चा सुरु होत्या. एक महिन्या पूर्वी मळसिद्धा कांबळे यांना काही जणानी जेवणाच्या कारणावरुन मारहाण केली होती. त्याच्या विरोधात उमदी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. तसेच त्यांना अटकही केली होती. मात्र त्याची जामिनावर सुटका झाली होती.त्यामुळे त्यांचा राग मनात धरून हे कृत्य केले असण्याची आमसिद्धा यांनी पोलिसांना माहीती देताना संशय व्यक्त केला. अधिक तपास सपोनि भगवान शिदे करत आहेत.

फोटो :

बालगांव येथील आमसिध्दा कांबळे यांच्या राहते घर अज्ञाताने पेटविल्याने जळून खाक झाले आहे. घटनास्थळास डिवायएसपी नागनाथ वाकुर्डे,तहसिलदार अभिजित पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.

प्रकार निंदनीय आहे. तपासाच्या सुचना दिल्या आहेत. असे कृत्य करणाऱ्या वर कडक कारवाई करू 

नागनाथ वाकुर्डे, डिवायएसपी जत

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.