शाळांमध्ये धुमतेयं मोबाईलची रिंग. विद्यार्थ्यांमध्ये बेशिस्त : मोबाईवर खेळण्यात वाया जातोय वेळ: काही शाळात शिक्षकही व्यस्त.

0
7

जत,(का. प्रतिनिधी): तंत्रज्ञानाच्या विकासाचे फायदे आहेत तसेच तोटेही दिसून येतात. तंत्रज्ञानावर योग्य नियंत्रण नसले तर त्याच्या तोट्यांना कसे सामोरे जावे लागते याचा प्रत्यय सध्या जत तालुक्यातील जवळपास सर्वच शाळांमध्ये येत आहे. विद्या ग्रहण करण्याचे पवित्र ठिकाण असलेल्या शाळांमध्ये काही विद्यार्थी पालकांच्या दुर्लक्षितपणाचा गैरफायदा घेत मोबाईल घेऊन जात आहेत.तर काही अतिउत्साही पालंकाच्या कडून मिळविले किंमती मोबाईल आवाज क्लास चालू असतानाही घुमत आहे.तर त्यावर खेळण्यात आणि त्यातील फोटो,व्हीडीओ,वॉट्अँप,फेसबूक कमेंट् पाहण्यात त्यांचा वेळ जात असून इतरही विद्यार्थ्यांना त्यांच्यामुळे विचलित व्हावे लागत आहे.
जत तालुक्यातील ग्रामीण भागात हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आहेत. 10-15 वर्षापूर्वी ज्या शाळकरी विद्यार्थ्यांना पायात घालण्यासाठी चप्पल मिळत नव्हती त्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील  विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या दफ्तरात आता किंमती मोबाईलचा आवाज खणखणताना दिसत आहे.
विद्यार्थ्यांना शाळेत मोबाईल घेवून जाता येत नाही असा नियम आहे. पण काही शाळेतील शिक्षकही मोबाईल वर व्यस्त राहत असल्याने विद्यार्थ्यी तर कसे मागे राहतील.त्यामुळे सर्व नियम धाब्यावर ठेवले जात आहेत. याकडे वर्गशिक्षक व मुख्याध्यापकांचेही दुर्लक्ष आहे. मुले व मुली मोबाईल घरी विसरला तर वाटेतून घरी परत जात असतात. पण एखाद्या विषयांची वही विसरल्यास घरी जाऊन ती आणताना दिसत नाहीत. संपर्काचे साधन म्हणून मोबाईलची सेवा आवश्यक ठरली आहे.पण नको तिथे या सेवेचे अतिवापर नुकसानकारकच ठरत आहे.
विद्यार्थ्यांकडून मोबाईल सेवेचा सदुपयोग करण्यापेक्षा दुरुपयोग जास्त होत असल्याचे ग्रामीण भागात दिसत आहे.विद्यार्थ्यांचे लक्ष शिक्षणाकडे नसून फक्त मोबाईल बाळगणे, त्यावर गाणी वाजविणे किंवा फोटो काढून एकमेकांना पाठविण्याकडे असते. काही विद्यार्थी तर इंटरनेटचा वापर करून नको त्या गोष्टीच्या आहारी गेल्याचेही सांगितले जाते. अशावेळी पालकांनी आपल्या मुलांमुलींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पण तसे होत नाही. मोबाईलच्या नादामुळे त्यांचे लक्ष अभ्यासाकडे राहात नाहीत. परिक्षेच्यावेळी सुद्धा त्यांचे अभ्यासात लक्ष लागत नाही.
यातून परीक्षेत कॉपी करण्याकडे कल वाढतो. अनेक शाळेतील काही शिक्षक परीक्षेच्या वेळी कॉपी देण्यास सहकार्य करीत असतात. आपल्या शाळेचा निकाल उत्कृष्ट लागला पाहिजे हा त्यांचा उद्देश असतो. माझा मुलगा अभ्यास करतो किंवा नाही याची त्यांना जाणीव राहात नाहीत. आई-वडिलांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन विद्यार्थी मोबाईलशी खेळ खेळत असतात.
आधीच्या साध्या फोनपेक्षा स्मार्ट फोनचे वेड विद्यार्थ्यांना जास्त आहे. त्यातील वेगवेगळ्या खेळांपासून तर विविध सुविधांपर्यंत सर्वच गोष्टी त्यांना खुणावत असतात. काही विद्यार्थ्यांचे आई-वडिल अशिक्षित असूनही मुलगा हट्ट करीत असल्यामुळे ते मोबाईल घेऊन देतात. अशावेळी विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी शाळेतील शिक्षकांची असते. मात्र त्यांचेही त्याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
वर्गशिक्षक व मुख्याध्यापक यांनी लक्ष घालून शाळेत मोबाईलची पूर्णपणे बंदी घालावी व विद्यार्थ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here