…तरीही खडड्यातला रस्ता शोधून ठिगळ लावू

0
Rate Card

वळसंग, वार्ताहर :

जत पासून सोलापूर सारख्या महत्वपूर्ण शहरांना जोडणारा राज्य मार्ग जो वळसंग,गुड्डापूर,माडग्याळ, उमदी व चडचण या सारख्या महत्वपूर्ण गावामधून मार्गक्रमण करतो,सध्या म्हणण्यापेक्षा कायम या राज्यमार्गाची दुरवस्था झालेली असते. रहदारी जास्त प्रमाणात असल्याने रोज प्रवास करणाऱ्या वाहनांना चक्क रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता ओळखणे देखील अवघड झाले आहे. महत्वपूर्ण गावं आणि तालुक्याचं ठिकाण असल्याने वाहनांची वर्दळ जास्त असते. अनेक वेळा वळसंग जवळ असलेल्या कॉर्नरला महिन्यातून 1-2  अशी भिषण अपघाताची साखळी निर्माण झालेली आहे. आता कारखाने सुरु होणार आहेत. त्यामुळे अवजड वाहने पुन्हा रस्त्यावरून धावणार आहेत.प्रांरभी असलेल्या स्लाईनवरच्या रस्त्याची पुन्हा दुरवस्था होणार यांत दुमत नको. ट्रॅक्टर आणि ट्रक यांच्यामुळे खड्डयांची संख्या पुन्हा वाढणार आणि यात रोजरास धावणाऱ्या ग्रामीण भागातील रहदाऱ्याच्या जीवावर उठणार अशी भीती निर्माण झाली आहे. 

      सदर राज्य मार्ग पूर्णतः नष्ट झाला आहे.प्रवास करताना वाहनांना कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकवताना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. पुन्हा प्रशासनाने पॅचवर्क करायला सुरुवात केली आहे परंतु पावसाळा संपला असला तरीही या कारखान्याच्या अवजड वाहनांसमोर तुमचं ठिगळं किती दिवस चालणार असा प्रश्नचिन्ह प्रत्येक प्रवासी करतो. वेळोवेळी या रस्त्याबाबत ‘संकेत टाइम्सने’ दखल घेत रस्त्याच्या परिस्थितीबाबत, गतिरोधक प्रश्नाबाबत मत मांडले. परंतू कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून प्रशासनाकडून काहीकेल्या झाल्या नाहीत. जनता प्रश्न उपस्थित करत आहे की “एखाद्याच जीव गेला तरीही आम्ही….खड्ड्यातला रस्ता शोधून ठिगळं लावू” अशीच एकेरी भूमिका संबधित विभाग पार तर पाडत नसेल…? एकूण रस्ता पूर्ण मोडकळीस आला आहे. आणि रस्त्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे आणि आवश्यक तेथे गतिरोधक इ. निर्मिती करून द्यावी अशी आर्त हाक जनतेतून होत आहे.

डांबर गुल्ल… रस्त्यावर फक्त धूळ !
जतकडून -कर्नाटकातील चडचण कडे जाणाऱ्या या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पाणी साठून राहिल्याने पावसाळ्यात याचा अंदाज येत नव्हता. पाऊस संपल्यानंतर आता हे खड्डे उघडे पडले आहेत. या रस्त्यावर नियमित वाहतुकीची मोठी वर्दळ असल्यामुळे रस्त्यावरील डांबर पूर्णत: गुल्ल झाले आहे आणि त्याजागेवर छोटे दगड आणि मातीची निव्वळ धूळ बघायला मिळत आहे.वाहनांच्या वर्दळीमुळे उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त झाली आहेत.

जत-चडचण मार्गावर धोकादायक वळणावर पडलेला खड्डा जिवघेणा बनला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.