नगरपालिकेत सत्तेसाठी “रणसंग्राम” चौंरगी लढतीची शक्यता : भाजप, कॉग्रेेेस,राष्ट्रवादी कॉग्रेेेस,महाआघाडीत लढत

0

जत,प्रतिनिधी : जत नगरपालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.तालुक्यातील मोठे सत्ता 

 केंद्र असलेल्या नगरपालिकेत आपल्याच समर्थकांची सत्ता असावी म्हणून आमदार विलासराव जगताप, कॉग्रेेेस नेते विक्रम सांवत, माजी सभापती सुरेश शिंदे यांनी तयारी सुरू केली आहे. ग्रामपंचायती पासून जतचे किंगमेकर असलेले सुरेश शिंदे यांच्या नेतृत्वाला गत नगपालिका निवडणूकीत धक्का देत विक्रम सांवत यांनी मोठे यश मिळविले होते. त्यामुळे सुरेश शिंदे यांना त्याचे मोठे आवाहन असणार आहे. दुसरीकडे केंद्र व राज्यातील सत्ता पक्ष असणाऱ्या भाजप आमदार विलासराव जगताप यांनी यावेळी स्वबंळाचा नारा देत पालिकेवर सत्ता मिळवायची म्हणून चंग बांधला आहे. काही नाराजाची तिसरी आघाडीही उदयास येणार आहे. त्यामुळे यंदा चौंरगी लढती होणार आहे.निवडून तारिख ठरल्याने इच्छूंक,नेते सक्रीय झाले आहेत.30 हाजार मतदार असलेल्या जतेत या निवडणूकीसाठी दहा वार्डाची रचना केली आहे. त्यात प्रत्येकी दोन असे वीस नगरसेवक व नगराध्यक्ष असे संख्याबंळ असणार आहे.पालिकेची स्थापना झाल्यानंतर 2 डिसेंबर 2012 रोजी मतदान होऊन 3 डिसेंबर 2012 रोजी मतमेजणी झाली होती. त्यानंतर पहिले मंडळ अस्तित्वात आले होते. आता होत असलेली ही दुसरी निवडणूक आहे.ग्रामपंचायतीची नगरपालिका झाली बघता बघता बजेट वाढले होते. मात्र तिन वर्षात नगपालिका वाटली नव्हती अखेरच्या टप्प्यात मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी केलेल्या कामामुळे पालिका काय असते हे दाखविले. कामेही झाली आहेत.डिसेंबर 2012 मध्ये वसंतदादा विकास आघाडी व राष्टवादी आणि कॉँग्रेस अशी तिरंगी लढत झाली होती. सुरुवातीस कॉँग्रेसला बाजूला करून विकास आघाडी व राष्टवादीने सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत राष्टवादीमधील नगरसेवकांत फूट पडली. विकास आघाडी व कॉँग्रेस आणि राष्टवादीमधील तीनपैकी दोन नगरसेवक एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्यात आली. मागील महिन्यात वसंतदादा विकास आघाडी राष्ट्रवादीत विलीन करण्यात आली. परंतु या आघाडीतील सर्वच नगरसेवकांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Rate Card

काँग्रेसचे नेते जिल्हा बॅँकेचे संचालक विक्रम सावंत समर्थकांची सध्या नगरपालिकेत सत्ता आहे. वीसपैकी एकोणीस नगरसेवक त्यांच्याकडे आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. डॉ. पतंगराव कदम, आ. मोहनराव कदम व युवक कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांचा जत शहरात कार्यक्रम घेऊन, त्यांनी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु आगामी निवडणुकीतील उमेदवार, प्रचार यंत्रणा, प्रचारातील मुद्दे, आजपर्यंत केलेले काम व यापुढे करणार असलेले काम यावर त्यांचे यश अवलंबून राहणार आहे.कॉग्रेस कडून माजी जिल्हा परिषद सदस्या मिनाक्षी अक्की,विद्यमान नगरसेविका शुंभागी बन्नेनावर यांची नावे चर्चेत आहेत.
आ. विलासराव जगताप यांनी शासनात सहभागी असलेल्या घटकपक्षांना सोबत घेऊन एक समिती स्थापन केली आहे. निवडून येणारा कार्यक्षम कार्यकर्ता असेल तर त्याला उमेदवारी देऊन भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून निवडून आण्ण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.भाजपकडून भाजप नेते डॉ. रविंद्र आरळी यांच्या पत्नी डॉ. रेणूका आरळीचे नगराध्यक्ष पदासाठी नाव चर्चेत आहे.
आ. जयंत पाटील यांनी बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे यांना राष्ट्रवादीत घेऊन जत शहरातील पक्ष भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी त्यांनी शिंदे यांच्यावर सोपविली आहे.नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अद्याप कळू शकला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.