डफळापूरातील राजरोस मटक्यासह अवैध धंदे बंद करा

0

डफळापूर,वार्ताहर : डफळापूर परिसरातील बेंबदपणे सुरू असलेले अवैध धंदे बंद करावेत अशा मागणीचे निवेदन रिपाइं डफळापूर शाखेच्या वतीने महानिरिक्षक विश्वास नांगरेपाटील यांना दिले.

Rate Card

निवेदनात पुढे म्हटले आहे की,  डफळापूरात अवैध धंद्यानी उच्चांद मांडला आहे. गावात मटका,दारू,शिंदी,तिनपानी जुगार,सह सर्व अवैध धंदे राजरोस पणे सुरू आहेत. त्यामुळे अनेक कुंटुबे उद्धवस्त होत आहेत. अशा उघड्या धंद्यामुळे अनेक तरूण वाममार्गाला लागले आहेत. तसेच डफळापूर स्टॅड परिसरात प्रवाशी वाहतूक करणारे वाहने कशीही अस्तावेस्त लावली जात आहेत. त्यामुळे सामान्य जनतेला त्रास होत आहे. त्यामुळे स्टॅड परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी. व बेधुंदपणे सुरू अवैध धंदे समुळ बंद करावेत अशी मागणी केली आहे.निवेदनावर संभाजी बनसोडे,रोहित आठवले,शुभम शेलार,प्रसाद कांबळे,रमेश वाघमारे,दयानंद वाघमारे यांच्या सह्या आहेत.निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलिस प्रमुख दत्ताञय शिंदे, डिवायएसपी नागनाथ वाकुर्डे, पोलिस निरिक्षक राजू तासिलदार यांना दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.