सांगली :वारणानगर प्रकरण ताज असतानाच पुन्हा सांगली पोलिसाची बेआब्रू झाली आहे. लूटमारप्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत अशोक कोथळे (वय 26, रा. भारतनगर, कोल्हापूर रस्ता, सांगली) या कोठडीत असलेल्या आरोपीचा सांगली शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे यांच्या पथकाने थर्डडिग्रीचा वापर करुन खून केल्याचा प्रकार मंगळवारी अखेर समोर आला. हा खून पटविण्यासाठी कामटेंच्या पथकाने आरोपी पळूनगेल्याचा बनाव रचला तसा गुन्हाही दाखल केला,व आपले कृृृत्य झाकण्यासाठी मृतदेह आंबोलीत जाळल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी कामटेंसह पाच पोलिस व एक झिरो पोलिस अशा सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांना अटकही करण्यात आली आहे.पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, सूरज मुल्ला, राहुल शिंगटे व झिरो पोलिस झाकीर अशी पथकातील अटक केलेल्या सहाजणांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध खून, पुरावा नष्ट करणे, शासकीय पदाचा गैरवापर करणे, आरोपींना मारण्यासाठी थर्डडिग्रीचा वापर करणे, असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे प्रकरण सीआयडीकडे देण्यात येणार असल्याची माहिती विश्वास नांगरेपाटील यांनी दिली.कवलापूर (ता. मिरज) येथील संतोष गायकवाड या अभियंत्यास चाकूच्या धाकाने लुबाडल्याप्रकरणी अनिकेत कोथळे व अमोल सुनील भंडारे (वय 23, रा. भारतनगर, कोल्हापूर रस्ता, सांगली) या दोघांना अटक केली होती.
कोथळेला गुन्हा कबूल करण्यासाठी थर्डडिग्रीचा वापर करुन त्याला बेदम मारहाण केली. त्याचे डोके पाण्यात बुडवून ठेवले. प्रचंड मारहाण आणि डोके पाण्यात बुडविल्याने कोथळेचा डीबी रुममध्येच मृत्यू झाला. हा सर्व प्रकार सुनील भंडारे यांना पाहिला होता. कोथळेचा खून झाल्यानंतर जागे झालेल्या कामटेसह सहकार्याने सुनिलला पळवून लावत आरोपींनी पलायन केल्याचा बनाव केला होता. मात्र नातेवाईकांनी यांची कुणकुण लागल्याने ते रस्त़्यावर उतरल्याने जिल्हा पोलिस प्रमुख दत्ताञय शिंदे यांनी लक्ष घातल्याने हे प्रकरण समोर आले आहे. यात कोथळेचा मृतदेह आंबोलीत नेहून जाळून पुरावा नष्ठ करण्याचा प्रयत्न केला आहे. घटनास्थळी जात तपास अधिकाऱ्यांनी मृत्तदेहाचे अवषेश ताब्यात घेतले आहेत. पोलिसांनी केलेल्या या कृत्याचा सर्वत्र तिरस्कार केला जात आहे.





