जत,प्रतिनिधी : आयजीच्या संवाद कार्यक्रमात जत शहरातील त्रस्त नागरिकांनी वाहतूक समस्येला विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरेपाटील यांच्या समोर वाचा फोडली.जत दौऱ्यावर असलेल्या नांगरेपाटील यांनी घेतलेल्या स्टार 100 च्या बैठकीत वाहतुकसह अन्य समस्येची गाऱ्हाणी मांडली.तात्काळ शहरात वाहतूक शाखा सुरू करण्यात यावी,तसेच जत बाजार पेठेत सीसीटिव्ही बसविण्याचे आदेश दिले.
स्टार 100 ग्रुपची बैठक साई प्रकाश मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार उमाजीराव सनमडीकर, जिल्हा पोलिस प्रमुख दत्ताञय शिंदे,शंशिकात बोराडे,डिवायएसपी नागनाथ वाकुर्डे, पोलिस निरिक्षक राजू तासिलदार,नगराध्यक्ष इकबाल गंवडी आदि उपस्थित होते.
जत शहरातील वाहतूक कोंडी नित्याची बनली आहे. पोलिस,नगरपालिका ,प्रशासनात समन्वय नसल्याने वाहतूक कोंडीच्या समस्येने जत सह तालुक्यातील जनता हैराण झाली आहे. वैतागलेल्या जनतेनी नांगरेपाटील यांच्या समोर वाचा फोडली.जत आरपीआयचे संजय कांबळे,जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, मिनाक्षी अक्की यांनी हा विषय
विषय उपस्थित केला. शहरातील बसस्थानक, विजापूर-गुहागर मार्ग,गांधी चौक,बनाळी चौक,महाराणा प्रताप चौक,या ठिकाणी वाहतूकीची दिवसभर कोंडी असते.वाहतूक शाखेचा एकही पोलिस उपस्थित रहात नाही. गांधी चौकात पोलिस चौकी सुरू करावी अशी मागणी कांबळे यांनी केली.विश्वास नांगरेपाटील म्हणाले, जत स्वच्छ आहे, पोलिसावर दबाबं न टाकता सुसंवाद साधावा,स्मार्ट पोलिस स्टेशन निर्माण करण्याच्या सुचना आम्हाला पंतप्रधानानी दिल्या आहेत. तशा पध्दतीने आमचे काम सुरू आहे,जागरूक,जबाबदार,प्रशिक्षण,अ
पोलिसांनी शहरात वाहतूक शाखा सुरू करावी, सध्या पाच पोलिसाची नियुक्ती करावी,तसेच पोलिस चौकीही सुरु करावी.बाजार पेठेत सीसीटिव्ही कँमेरे बसवावेत.उमेंश सांवत यांनी दहा सीसीटिव्ही संच देण्याचे जाहिर केले.जिल्हा पोलिस प्रमुख दत्ताञय शिंदे म्हणाले,लोकांच्या सहभागाने पोलिसांनी नियोजन करावं,लोकांना काय हंव यासाठी अशा सभेचे नियोजन आहे.रस्ते महत्वाचे आहेत. रस्ते चांगले असणे गरजेचे, नियमबाह्य वाहने चालविणे याबाबत जागृत्ती गरजेची आहे. सुरक्षेसाठी नियम पाळणे गरजेचे महत्वाची आहेत.शैक्षणिक प्रगती न बघता जादा क्षमतेच्या गाड्या पालकांनी देऊ नये,पोलिसांकडून कारवाई सुरू आहेत. वाहतूकी विरोधातील कारवाईने यावर्षी 29 जणांचा प्राण वाचले.नगरपालिकेचे अतिक्रमने काढावित.
चौकट : संखला पोलिस ठाण्याची मागणी
जत तालुक्याच्या विस्तार,सिमाभागाचा विचार करता अतिरिक्त संख पोलिस ठाण्याच्या मागणीचा प्रस्ताव आमदार विलासराव यांनी दिला.आघाडी सरकारच्या काळात या ठाण्यास मंजूरी मिळाली होती. मात्र ठाणे सुरू झाले नाही. यावर शासनाकडे पाठपुरावा करू असेही यावेळी नांगरेपाटील यांनी सांगितले.
जत येथील स्ट्रार 100 च्या सुसंवाद बैठकीत बोलताना कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरक्षक विश्वास नांगरेपाटील,जिल्हा पोलिस प्रमुख दत्ताञय शिंदे,आ. विलासराव जगताप आदि





