जत नगरपालिका निवडणूकीचे बिगुल वाजले 13 डिसेंबरला मतदान 14 ला मतमोजणी ,आचारसहिंता सुरू : 20 नगरसेवक, नगराध्यक्ष निवड होणार

0

मुंबई :जिल्ह्यातील जत नगरपालिकेच्या निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूकीची आचारसहिंता मंगळवार पासून जारी करण्यात आली. पालिकच्या 20 नगरसेवक व थेट नगराध्यक्ष पदासाठी 13 डिंसेबरला मतदान तर 14 ला मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणुक कार्यक्रमाची घोषणा केली.राज्यात निवडणूक होत असलेल्या जत नगरपालिकेची ही निवडणूक अतिशय लक्षवेधी व तिंरगी होणार आहे. त्या निवडणूकीचे रणसिंग मंगळवारी निवडणूक आयोगाने फुंकले.मंगळवार पासूनच आचारसहिंता जारी करण्यात आली आहे. 14 नोव्हेंबर पासून निवडणूकीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. 13 डिंसेबरला मतदान होणार असून तत्पुर्वी नामनिर्देशनपत्रे 18 ते 24 नोव्हेंबर 2017 या कालावधीत ऑनलाईन स्वीकारली जातील. 25 नोव्हेंबर 2017 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील.थेट नगराध्यक्ष निवडणूकीमुळे मोठा सत्ता संघर्ष यावेळी बघायला मिळणार आहे. कॉग्रेस,भाजप व राष्ट्रवादी कॉग्रेस असा तिंरगी सामना रंगणार आहे. जत तालुक्यातील भाजप आमदार विलासराव जगताप, कॉग्रेेेस नेते तथा जिल्हा बँक संचालक विक्रम सांवत, माजी सभापती सुरेश शिंदे यांची प्रतिष्ठा या निवडणूकीत पणाला लागली आहे. तालुक्यातील वर्चस्वासाठी तिन्ही नेते नगरपालिका आपल्याच गटाच्या ताब्यात रहावी यासाठी शर्तीने प्रयत्न करत आहेत.आमदार विलासराव जगताप यांनी स्वबंळावर लढणार असल्याचे जाहिर केले आहे. जत ग्रामपचांयती पासून वर्चस्व असणारे सुरेश शिंदे यांनी गड राखण्याचे आव्हान आहे. कॉग्रेस नेते विक्रम सांवत यांना जतकर आणखी संधी देणार का ? हे या निवडणूकी नंतर ठरणार आहे. इच्छूंकाची तयारी सुरू आहे. दरम्यान जतच्या प्रसिध्द यल्लम्मा देवीची यात्राही 12 तारखेला होणार आहे. त्यावेळी लाखो भाविक जत नगरीत येणार आहेत. अशा निवडणूकीची धामधूम होणार असल्याने पोलिस व प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.