चित्रपट : थँक्यू विठ्ठला ,,

0

चित्रपट थँक्यू विठ्ठला ,,


“”” पहावा विठ्ठलबोलावा विठ्ठलमदत करी विठ्ठलआपणासी “” प्रत्येक माणसाला आपण कोणीतरी मोठे बनावेसध्या जे आपण जीवन जगत आहोत त्यापेक्षा काहीतरी वेगळं जीवन आपल्या वाटयाला यावेदुसऱ्याकडे खूप आहे माझ्याकडे त्या व्यक्तीसारखं काहीच नाहीहि खंत करीत असतानादुसऱ्या व्यक्तीला लाभलेलं जीवन त्याच्या सारखे सुख आपणालाही लाभावं अशी इच्छा सर्वसामान्य माणसाच्या मनांत येतेआणि त्याच्या सारखे जीवन आपणाला जगता येईल कां या आणि अश्या अनेक कल्पनेवर आधारित थँक्यू विठ्ठला ची निर्मिती एमजीके प्रोडक्शन यांनी केली असून निर्माते गोवर्धन नारायण काळेगौरव गोवर्धन काळेअंजली सिंगयांनी केली आहेकथा दिगदर्शन देवेंद्र शिवाजी जाधव यांचे असून सहनिर्माता आणि पटकथा एमसलीम यांची आहेछायाचित्रण दिनेश सिंग,संगीत रोहनरोहन यांचे असून या मध्ये महेश मांजरेकरमकरंद अनासपुरेमौसमी तोंडवळकरस्मिता शेवाळे ओदकपूर्वी भावेदीपक शिर्केजयवंत वाडकरअरुण घाडीगावकरमिलिंद सफाईइत्यादी कलाकार आहेत.

हरीभाऊ हा एक सर्वसामान्य गरीब माणूसडबेवालाघरोघरी टिफीनचे डबे पोहोचविण्याचे काम प्रामाणिकपणे करीत असतोहे डबे एका कॉर्पोरेट कंपनी मध्ये पोहोचविताना त्याची वर्दे साहेबांची गाठ पडतेकंपनीला नफा झाल्याने ते बोनस जाहीर करतातत्यांची श्रीमंती पाहून हरीभाऊला सुद्धा आपले जीवन त्यांच्या सारखे असावे असे वाटतेहरीच्या घरी मुलाची फी भरायला पैसे नसतातत्यामुळे घरी चिडचिडकटकटी सुरु असतातआपल्याला मिळालेल्या जीवनाची दाद मागायला तो विठ्ठलाच्या मंदिरात जातोआणि आश्चर्य म्हणजे विठ्ठल त्याला भेटतोहरी त्याला सगळी हकीगत सांगतो,विठ्ठल त्याला समजावताना सांगतात कितुझा हाच प्रश्न आहे ना कि सगळ्यांना सगळी सुखं का दिली नाहीतगरीब श्रीमंत हा भेद तुम्ही केलाजन्माला येताना सगळे सारखेच जन्माला येतात,नशिबाला कर्तृत्वाची जोड द्यावी लागतेतुमच्या पूर्वजन्मीचं कर्म या जन्मीचं प्राक्तन असतंतुझा आतताईपणा तुझा एक दिवस घात करणार आहेजो पर्यंत तुझा संयम वाढत नाही तो पर्यंत तू कधीच सुखी होऊ शकणार नाहीस,

हरीभाऊंच्या विनंती वरून विठ्ठल त्याला वर्दे बनवताना सांगतो कि तुझा विवेक आणि चेहरा जरी तोच असला तरी लोकांना तू वर्दे म्हणूनच दिसणार आहेसहरीभाऊ वर्दे बनतात पण त्यांच्या आयुष्यात सुख समाधान मिळत नाहीकाही घटनांच्यामुळे तो आत्महत्या करायला निघतो पण तेथे विठ्ठल सामोरा येतोहरीभाऊ त्याला सांगतो पैश्याने माणसं मॅनेज करता येतातमला मंत्री बनायचं आहेमला कृषी खातं दे मी विकास करून दाखवतो पण तेही त्याला जमत नाही तो आणखी गडबड करून ठेवतोकृषी मंत्र्यांचं आयुष्य जगत असताना त्याचे पाप – पुण्य हि हरीभाऊच्याच माथी येते आणि एक दिवस त्याला घेऊन जायला यमदेव आपल्या दूता सह येतात त्यावेळी हरीभाऊ मला ह्या मंत्र्यांच्या आयुष्यातून बाहेर काढा अशी विनंती करतोतो म्हणतो देवांचं आयुष्यच हेच खरं आयुष्य आहे मला आता यमदेव बनवाविठ्ठल त्याची इच्छा पूर्ण करताना सांगतो कि हि तुझी शेवटची संधी आहेहरीभाऊ आपले माणूसपण विसरत नाहीदेव आणि मानव यातला फरक तो समजून घेत नाहीचुका होतात,,, शेवटी त्याला सुख मिळते का हरीभाऊंच्या आयुष्यात कोणते जीवन तो श्रेष्ठ मानतो वेगवेगळ्या आयुष्यातील व्यक्तिरेखा जगत असताना हरीभाऊला कोणता बोध होतो अश्या अनेक प्रश्नाची उत्तरे ह्या सिनेमात मिळतील.

Rate Card

या सिनेमात महेश मांजरेकर यांनी विठ्ठलाची भूमिका समर्थपणे पेलली आहेमकरंद अनासपुरे यांनी हरीभाऊ साकारतांना वेगवेगळ्या चार भूमिका सादर करून त्याला न्याय दिलेला आहेसोबतीला मौसमी तोंडवळकरवरद सरंबेळकरदीपक शिर्केमिलिंद सफाईअरुण घाडीगावकरजयवंत वाडकरअभिजित चव्हाणअसे अनेक कलाकारांनी आपल्या भूमिका व्यवस्थित साकारल्या आहेतदेवेंद्र जाधव यांनी या चित्रपटाचे दिगदर्शन केलं आहे.

सुखाच्या शोधात निघालेल्या हरीभाऊला चार वेगवेगळे जीवन जगावे लागतेविठ्ठल सांगतो किवाळवंटात मृगजळ तू शोधत आहेसपण तो असतो फक्त आभासपैश्यामुळे माणूस वरपर्यंत पोहोचतो काया जगातून जाताना तो काहीही वर घेऊन जात नाहीफक्त त्याच्या कर्माची फळं त्याच्या सोबत येतातआणि कर्मामुळे निर्माण झालेलं पुण्य त्याला संकटात मदत करतंसमाधान सुख हे आपल्या मानण्यावर आहेअसा संदेश जाताजाता हा सिनेमा देऊन जातो.


दीनानाथ घारपुरे मनोरंजन प्रतिनिधी ९९३०११२९९७

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.