कथा शाळांची व्यथा विद्यार्थ्यांची अनेक शाळा उघड्यावर: प्रस्ताव देऊनही निधी मिळेना; विद्यार्थ्याचे भवितव्य अंधकारमय || संकेत टाइम्स

0

जत- प्रतिनिधी: जत तालूक्यातील अनेक शाळा खोल्याचे निर्लेकन करून जून्या इमारती पाडव्याच्या आहे. नव्या खोल्याचे प्रस्ताव संबधित शाळेने पंचायत समिती कडे दिले आहेत. पंरतू निधीची तरतूद नसल्याने अनेक गावातील शाळामधील विद्यार्थी खाजगी खोल्यात, वरांड्यात किंवा एकाच वर्गाची तीन तीन इयत्ताचे वर्ग बसवून शाळा सुरू आहेत.यामुळे विद्यार्थ्याचे मोठे नुकसान होत आहे.परिणामी खाजगी शाळामधील विद्यार्थी संख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. तर जिल्हा परिषदेचे शाळात विद्यार्थी संख्या बोटावर मोजण्याएवढे आहेत.लोकप्रतीनीधीचे दुर्लक्ष व संबधित विभागाकडून गतीने उपाययोजना नसल्याने अनेक विद्यार्थ्याचे भवितव्य अंधकारमय बनले आहे. वरांड्यात उघड्यावरच बसून अनेक विद्यार्थी आजारी पडत आहेत.जत तालुक्यातील पन्नासभर शाळाची आवस्था अशी आहे.अनेक शाळाना बांधकाम व दुरूस्तीमध्ये शाळेला संरक्षक भिंत बांधण्यासाठी कसल्याही प्रकारच्या निधीची तरतूद राज्य शासनाकडून नाही. त्यामुळे जत तालूक्यातील शाळात इमारती रखडल्या आहेत.पन्नासवर जि.प. शाळांची दुरावस्था झाली आहे तर अनेक शाळांना कुंपनच नसल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी शाळांची जागा बळकावण्याचे प्रकार घडत असल्याने शासकीय मालमत्ता धोक्यात आली आहे. तसेच विद्यार्थीसंख्येच्या तुलनेत शिक्षकांची पदे रिक्त असल्याने ‘कथा शाळांची आणि व्यथा विद्यार्थ्यांची’ अशी परिस्थिती जि.प.शाळांची आहे.

ठेकेदार व पदाधिकाऱ्याच्या खाऊ धोरणामुळे अनेक जि.प.च्या शाळा कुंपनाविनाच आहेत तर कोट्यवधींचा निधी खचरूनही शाळांच्या इमारतींची दुरवस्थाच आहे.आरटीआय कायद्यानुसार शिक्षणविभागाने जिल्ह्यासाठी वाढीव शिक्षकांची पदे भरण्यासाठी शासनाकडे मागील दोन वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे. परंतु शासनाकडून अद्यापही कसलाच निर्णय घेण्यात न आल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. शाळा बांधकाम व दुरूस्तीमध्ये शाळेला संरक्षक भिंत बांधण्यासाठी कसल्याही प्रकारच्या निधीची तरतूद राज्य शासनाकडून नाही.

भागात शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी शिक्षण विभागाकडून प्रगत महाराष्ट्र हा उपक्रम राबवून जि. प. शाळांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला आहे. प्राथमिक विभागावर राज्य शासनाकडून कोट्यावधी रूपये खर्च होत असल्याचे भासविण्यात असले तरी प्रत्यक्षात मात्र विद्यार्थ्यांना सुविधाच मिळत नसल्याचे चित्र आहे. शिक्षकांची कमतरता, इमारत गळती,शौचालयाचा अभाव, पिण्याचे पाणी, क्रींडागण यापासून वंचीत आहेत. शाळा सुरू होऊन पंधरवाडा उलटला तरी जत तालुक्यातील पन्नासभर जि. प. शाळांची दुरूस्ती झाली नसल्याने विद्यार्थ्यांना गळक्या वर्गखोल्यात ज्ञानार्जन करावे लागत आहे. तर काही ठिाकणच्या शाळेवरील जुने पत्रे काढून नविन बसविले आहेत. नवीन पत्रेही गळत असल्याच्या तक्रारी पालकांकडून प्राप्त होत असल्याचे वास्तव आहे. जत तालूक्यातील अनेक शाळांना कुंपन नसल्याने आवारात मोकाट जनावरांचा वावर वाढण्याबरोबरच काही जुगारी शाळेत ‘डाव’ मांडत असल्याचे पाहवयास मिळत आहे. तालूक्यातील अनेक शाळा महामार्गावर व डोंगराळ भागात आहेत. त्यामुळे अपघाताची भिती व्यक्त केली जात असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Rate Card

संरक्षक भिंत बांधण्यासाठी शासन स्तरावरून निधी मिळत नसल्याचे समजते. जिल्हा परिषदेच्या शाळांची झालेली दुरावस्था अद्यापही लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी गांभीर्याने घेतली नसल्याने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून ज्ञानार्जन करण्याची वेळ आली आहे. अनेकवेळा शाळांची इमारत दुरूस्ती करण्यासाठी मागणी करूनही आणि शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पालकांसह जिल्हा परिषदेच्या सदस्यांमधून केला जात आहे. आता तरी जिल्हा परिषदेला जाग येईल का? जत तालूक्यातील जि.प.शाळांची दुरूस्ती होईल का? हे वेळच येणारी ठरविणार आहे. 

जत तालुक्यातील शाळाची दयनीय स्थितीचे उदाहरण कोसारीतील शाळा खोल्या दुरूस्थी न झाल्याने विद्यार्थ्यांना मंदिरात बसून शिक्षण घ्यावे लागत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.