नोट बंदीच्या समर्थनार्थ रिपाइं साजरा करणार व्हाईट मनी डे – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

0

नोट बंदीच्या समर्थनार्थ रिपाइं साजरा करणार व्हाईट मनी डे – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले


मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – काळा पैसा रोखण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी केलेल्या नोट बंदीला दि. 8 नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे.  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काळा पैसा रोखण्यासाठी दर दहा वर्षांनी चलन बदलण्याचा विचार सांगितला होता. त्यानुसार प्रधानमंत्री मोदींनी गतवर्षी रु. पाचशे आणि हजाराच्या नोटांवर बंदी आणून चलन बदलले. या क्रांतिकारक निर्णयाच्या समर्थनार्थ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देशभर व्हाईट मनी डे साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

नोटबंदीच्या वर्षपूर्ती निमित्त दि. 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता दादर चैत्यभूमी येथिल महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन करून नोट बंदीच्या समर्थनार्थ व्हाईट मनी डे साजरा करण्यात येणार आहे. नोटबंदी च्या वर्षपूर्ती स्वागत उत्सव सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या अभिनंदन करण्यात येणार आहे. या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात रिपाइं च्या वतीने नोट बंदीच्या समर्थनासाठी व्हाईट मनी डे साजरा होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात महामानव डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ नोट बंदी च्या समर्थनासाठी प्रधानमंत्र्यांच्या अभिनंदनासाठी व्हाईट मनी डे साजरा करण्यात येणार असल्याचे रामदास आठवले यांनी जाहीर केले आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जाचे श्रेष्ठ अर्थतज्ज्ञ होते. त्यांच्या संकल्पनेतूनच भारतीय रिझर्व्ह बँकेची निर्मिती झाली आहे. असा डॉ आंबेडकरांच्या अर्थविषयक विचारांचा जाहीर गौरव नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले प्रधानमंत्री आहेत. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी भीम ऍप ची निर्मिती त्यांनी केली. देशातील काळा पैसा काळा बाजार भ्रष्टाचार रोखण्यासाठी दर दहा वर्षांनी चलन बदलण्याचा मार्ग महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला आहे .त्याची अंमलबजावणी प्रधानमंत्री मोदींनी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन नोटबंदीच्या वर्षपूर्ती निमित्त राज्यभर व्हाईट मनी डे रिपाइं साजरा करणार आहे. विरोधक ब्लॅक डे म्हणत असले तरी ती त्यांची चुकीची भूमिका असून रिपाइं दि. 8 नोव्हेंबरला व्हाईट डे साजरा करणार असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले. केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार बुधवार दि. 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता  मुंबईतील रिपाइं कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने चैत्यभूमी दादर येथे नोटबंदीच्या समर्थनार्थ आयोजित व्हाईट मनी डे स्वागत कार्यक्रमास मोठया संख्येने एकत्र येण्याचे आवाहन रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे  यांनी केले आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.