पुन्हा बालहक्क कायदा धाब्यावर

0

पुन्हा बालहक्क कायदा धाब्यावर

जत,प्रतिनिधी : जत शहरासह तालुक्यात बालहक्क कायद्या ढाब्यावर बसवून लहान मुलाकडून काम करून घेतले जात आहे. ज्या वयात शिकायचे असते त्या वयात मुंलाना रोजगाराला धाडले जात आहे. त्यातच शहरासह ग्रामीण भागातील अनेक हॉटेल, दुकानात बालहात राबताना दिसत आहेत. स्टँड व शहरात लहान मुला करवी भिक मागण्याचे कृत्य घडवून बालहक्कावर गदा आणली जात आहे. जत स्टँड परिसरात अशी पंधारा वीस बालके देवाचा फोटो घेऊन भित मागतानाचे प्रकार नित्याचे बनले आहेत. अगदी 4 ते 10 वयाची चिमुकले हातात थाळी व त्यात एकाद्या देवीचा फोटो व भंडारा घेऊन भिक मागतानाचे चित्र खरेचं अच्छे दिन अद्याप आले नसल्याचे दर्शवतात. ज्या वयात शिकायचे असते त्या वयात असले कृत्य करवून घेणारे तितकेच जबाबदार आहेत. असेच आज भिक मागतानाचे हात उद्या गुन्हेगारीकडे वळल्यास वाईट वाटू नये.

Rate Card

जत स्टँड परिसरात गोळा केलेले पैसे मोजतानाचे चिमुकले हळव्या पांलकाच्या डोळ्यात अश्रूं आणणारे दृष्य

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.