जतेत तरूण डॉक्टरची आत्महत्या
जतेत तरूण डॉक्टरची आत्महत्या
जत, प्रतिनिधी:येथील तरूण डॉक्टर श्रीनिवास पांडुरंग माने, (वय-31) यांनी सातारा रोडवरील स्वतःच्या क्लिनिक मध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे.
श्रीनिवास हे मूळचे येळवी (ता. जत) येथील रहिवाशी होते. येळवीचे माजी पोलीस पाटील पांडुरंग माने यांचा मुलगा व भाजप नेते आर. के. माने यांचा पुतण्या होत. वडीलांच्या मृत्यूनंतर आर. के. माने यांनीच श्रीनिवासचे संगोपन केले हाेते.

डॉ .श्रीनिवास हे एमडी (आयुर्वेद) होते. वर्षापुर्वीच लग्न झाले होते. त्यांच्या पत्नीही डॉक्टर आहेत. जत सातारा रस्त्यावर कन्या हायस्कूलजवळ चार महिन्यापुर्वी हॉस्पिटल सुरू केले आहे.
शुक्रवारी दुपारी त्यांच्या पत्नी जेवण करण्यासाठी घरी गेल्या होत्या. डॉ. श्रीनिवास बाजूला मेडिकलमधील आपल्या भावास आपण आतील रूममध्ये विश्रांती घेतो, कोणी पेशंट आले तर उठवा, असा निरोप दिला. सुमारे चारच्या दरम्यान त्यांचा भाऊ डॉ. श्रीनिवास यांना उठविण्यासाठी खोलीत गेले. त्यावेळी श्रीनिवास यांनी पंख्याला बेडशीटने गळफास लावल्याचे आढळून आले. त्यांनी तातडीने शेजारी खत दुकानातील चुलत भावास हाक मारली. दोघांनी श्रीधरला खाली काढले. तत्पुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
आत्महत्येची वार्ता समजताच आमदार विलालराव जगताप, मनोज जगताप, व परिसरातील अनेक मान्यवरांनी तसेच अनेकजणांनी जत ग्रामीण रूग्णालयात धाव घेतली.दरम्यान याबाबत गुन्हा जत पोलिसात दाखल झाला आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही.
