गुलांबी थंडीने शहरवासीयांना हुडहुडी
गुलांबी थंडीने शहरवासीयांना हुडहुडी

जत,प्रतिनिधी : गेल्या आठ दिवसांपासून किमान तापमानात सातत्याने घट होत असल्याने शहरवासीयांना हुडहुडी भरू लागली आहे. किमान तापमान 16.2 अंशावर आले. त्यामुळे आता उबदार कपडेही बाहेर पडू लागले असून रात्री रस्तेही लवकर सामसूम होत आहे. पावसाळा संपल्यानंतर पितृपक्षात अवकाळी पावसाचाच फटका सर्वत्र बसला. त्यानंतर ऑक्टोबर हिटने जतकर चांगलेच हैराण झाले होते. त्यामुळे दोन आठवडय़ांपूर्वी उकाड्य़ाने त्रस्त असलेल्या जतकरांना थंडीचे वेध लागले होते. त्यानंतर आठवडाभरापासूनच किमान तापमान कमी होऊन दिवाळीनंतर थंडी जाणवू लागली. तीन दिवसांपासून तर गारवा अधिक वाढला आहे. पाच दिवसांपासून तापमानात घट:दिवाळीची धामधूम संपल्यानंतर तापमानात घट होण्यासही सुरुवात झाली आहे. रात्रीची वर्दळ झाली कमी:रात्री आठ वाजेपासूनच गारवा जाणवू लागल्याने रस्तेही लवकर सामसूम होत आहे. एरव्ही रात्री साडे अकरा- बारा वाजेर्पयत वर्दळ असलेल्या शहरातील रस्त्यांवर आता दहा ते साडे दहा वाजेदरम्यानच सामसूम दिसून येत आहे. उबदार कपडय़ांचा वापर;थंडी जाणवू लागल्याने घरातील उबदार कपडे बाहेर काढले जात असून नवीन उबदार कपडय़ांचीही दुकाने थाटली आहेत. तेथेही खरेदीसाठी गर्दी होत आहे.