उमदी परिसरातील पाच हाजार जनावराचे आरोग्य धोक्यात शासनाचे पशुवैद्यकीय दवाखानाच आजारी : खाजगी उपचाराने जनावरे दगवण्याची भिती

0

उमदी परिसरातील पाच हाजार जनावराचे आरोग्य धोक्यात

शासनाचे पशुवैद्यकीय दवाखानाच आजारी : खाजगी उपचाराने जनावरे दगवण्याची भिती

उमदी,वार्ताहर :  जत तालुक्यातील जनावरांवर योग्य उपचार व्हावे,यासाठी जत तालुक्यातील अनेक गावात उभारण्यात आलेल्या पशु उपचार केंद्रात सध्या प्रचंड असुविधा निर्माण झाल्या आहेत.उमदी (ता.जत) येथील पशु उपचार केंद्राची असून अडचण नसून खोळंबा अशीच अवस्था झालेली आहे.त्यामुळे उमदी परिसरातील पाच हाजार जनावराचे आरोग्य धोक्यात आहे.

      येथील पशु वैद्यकीय केंद्रावर डॉक्टरांचा व औषधाचा ठणठणात असल्याने परिसरातील जनावरांचे आरोग्य घोक्यात आले आहे.येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात पशु वैद्यकीय अधिकारी कार्यालयी हजर राहत नसल्याने त्यांना शोधण्यातच शेतकऱ्यांचा वेळ जात आहे.तर काही वेळा फोन केल्यावरच ते उमदी येथील पशुकेंद्राकडे येतात.तसेच येथील पशु पालकांना खाजगी डॉक्टरांकडून उपचार करुन घ्यावा लागत आहे.काही वेळा शासन मान्य पशु उपचार केंद्रातील शिपाई हेच डॉक्टर बनून उपचार करतात.त्यामुळे काहीच माहिती नसताना आपल्या अधिकाऱ्याचे पाठ राखण (वाचवण्यासाठी) करण्यासाठी ते शिपाई स्व: ताच उपचार करतानाचे चित्र पहायला मिळत आहे.त्यात निदान योग्य होत नसल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आला आहे.

Rate Card

     उमदी येथे एक डॉक्टर दोन शिपाई यांची नेमणूक आहे.डॉक्टर उपलब्ध नसल्याने उमदीतील हे शिपाई जणू डॉक्टर असल्यासारखे उपचार करत जनावराच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार सुरु असल्याचे आरोप होत आहे.शासनाकडून मिळालेली औषधे बाहेरच्या दराने विक्री करत असल्याचे आरोप आहेत.त्यांची तपासणी फी देखील खाजगी डॉक्टरापेक्षा कितीतरी पटीने जास्त अाहेत,कोणत्याही पदव्या नसताना खाजगी डॉक्टर बेधडक जनावरावर उपचार करत आहेत. त्याच्या उपचारामुळे अनेकवेळा जनावरे दगावली आहेत.पंरतू शासनाने लाखो रुपये खर्चून उभारलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर नसल्याने पशुपालकांना काळ्या पेक्षा गोऱ्या बरा म्हणत खाजगी पशु डॉक्टरांचा आसरा घ्यावा लागत आहे.

उमदीत लाखो रुपये खर्चून बांधलेला प्रशस्त पशुवैद्यकीय दवाखाना बऱ्याच वेळा कार्यालयीन वेळेत असा कुलूप बंद असतो.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.