विजयी संरपच महिनाभर वेटींगवर सभागृहाची मुदत न संपल्याने जूनेच कारभारी

0

विजयी संरपच महिनाभर वेटींगवर 

सभागृहाची मुदत न संपल्याने जूनेच कारभारी 

जत,प्रतिनिधी :राज्य निवडणूक आयोगाने आणि राज्य सरकारने प्रथमच ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेतून थेट सरपंच निवडण्याचा निर्णय घेऊन तो अंमलातही आणला. जत तालुक्यातील 80 ग्रामपंचायतींत थेट सरपंच झाले. मात्र, संबंधित गावांतील ग्रामपंचायत सभागृहाची मुदत एक ते दीड महिन्यापर्यंत शिल्लक असल्याने नवे सरपंच तोपर्यंत नामधारीच राहणार आहेत. त्यामुळे निवडणुका झालेल्या गावांत सध्या दोन-दोन विद्यमान सरपंचांचे अस्तित्व दिसून येत आहे.पूर्वी ग्रामपंचायत सभागृहाची मुदत ही ग्रामपंचायतीचा निकाल केव्हा लागला त्या तारखेवर नव्हे, तर सरपंच निवड कोणत्या तारखेला झाली त्यावर सभागृहाची मुदत ठरलेली असे. यावेळी थेट सरपंच निवड आणि निकाल एकाच दिवशी झाल्याने भविष्यात निकाल लागलेली तारीख ही पाच वर्षांनंतर सभागृहाची मुदत असेल. मात्र, विद्यमान ग्रामपंचायत सभागृहाची मुदत ही पाच वर्षांपूर्वी झालेल्या सरपंच निवडीच्या तारखांवर अवलंबून आहे.पाच वर्षांपूर्वी साधारणपणे 21 नोव्हेंबरपासून चार-पाच टप्प्यात ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडी पार पडलेल्या आहेत.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाच्या निवडीसुद्धा अशाच कालावधीमध्ये होणार आहेत. त्यामुळे थेट सरपंच या कालावधीपर्यंत नामधारीच राहणार आहेत.मावळत्या सभागृहाची मुदत संपली की, 80 गावांत उपसरपंच निवडीचा कार्यक्रम होईल आणि त्यावेळीच नव्या सरपंचांना अधिकार मिळतील. उपसरपंच निवडीत मतदानाचा अधिकार केवळ ग्रामपंचायत सदस्यांनाच असेल. मात्र, उपसरपंच निवडीवेळी दोन्ही बाजूला समान सदस्य झाल्यास थेट सरपंचांना आपले निर्णायक मत देण्याचा अधिकार नव्या कायद्यामुळे प्राप्‍त झाला आहे. त्यामुळे दोन्ही गटांकडे समान सदस्यसंख्या असलेल्या गावांत थेट सरपंचांना निर्णायक महत्त्व प्राप्‍त झाले आहे.यावेळच्या निवडणुकीत ग्रामपंचायत निकालादिवशी थेट सरपंच निवडून आले. त्यांना निवडणूक आयोगातर्फे तसे प्रमाणपत्रही बहाल करण्यात आले. त्यामुळे त्यांना सरपंचपदाचा दर्जा प्राप्‍त झाला आहे; पण मावळत्या सभागृहाची मुदत संपलेली नसल्याने त्या सभागृहातील सरपंचदेखील विद्यमान सरपंचच आहेत. थेट सरपंच निवडणूक प्रथमच झाल्यामुळे निवडणुका झालेल्या गावात एकावेळी दोन- दोन सरपंच अस्तित्वात असल्याचा घटनात्मक पेच निर्माण झाला आहे.

Rate Card

चौकट 

उपसंरपचासाठी गुडघ्याला बांशिग

तालुक्यातील 80 ग्रामपंचायतीच्या थेट संरपचासह सदस्याची निवडणूक प्रक्रिया संपली आहे. थेट संरपच असल्याने उपसंरपचासाठी अनेक सदस्यांनी गुडघ्याला बांशिग बांधले अाहे. सरपंच होता न आलेले अनेक गावातील सदस्यांनी आता उपसंरपच होणारचं म्हणून तयारी सुरू केली आहे. निवडणूकीसाठीच्या जोर बैठका,सामाजिक समतोल,जात फँक्टर,नेत्याची एकनिष्ठता,मताधिक्य,युवक सदस्याची नावे चर्चेत आहेत. त्यातच काही गावात संरपच विरूध गटाचा तर बहुमत दुसऱ्या गटाकडे असल्याने संरपचा ऐवढेच महत्व उपसंरपचला येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.