बालगांवात विवाहित महिलेचा विहिरीत बुडून मुत्यू
जत तालुक्यात आतापर्यत चार जणांनी पाण्यात जिव गमावला
उमदी,वार्ताहर :बालगांव (ता.जत) येथील कावेरी उमेश लोणी (वय- 34) ह्या विवाहित महिलेचा विहिरीत पडल्याने बुंडून मृत्यु झाला. घटना सोमवार ता.23 ला घडली.याबाबत उमदी पोलिसात सुरेश बाबुराव लोणी यांनी फिर्याद दिली त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
घटनास्थळ व पोलिसाकडून मिळालोली अधिक माहिती अशी की, बालगांव येथील कावेरी उमेश लोणी ही विवाहित महिला सोमवारी सकाळी दहा वाजता शेता शेजारील चंद्राम बगली यांच्या विहिरीत पडल्याची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली होती. स्थानिक लोकांनी मृत्तदेह काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी झाला. मंगळवारी सांगली येथून आलेल्या जीवरकक्ष पथक व उमदी पोलिसाच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी दहा वाजता घटना स्थळी विहिरीत शोध मोहीम सुरु केली अवघ्या अर्धा तासात मृतदेह शोधून काढण्यात जीव रक्षक पथकाला यश आले.कावेरीचा मृतदेह बाहेर काढताच कुटुंबियानी एकच हंबरडा फोडला
मृत्तदेह विहिरी बाहेर काढला. महिला कोणत्या कारणामुळे विहिरीत पडली याची नेमकी माहिती मात्र अद्याम मिळाली नाही. बालगांव पासून दोन किमी अंतरावर उमेश बाबुराव लोणी यांचे शेतजमिन आहे. यांना दोन पत्नी आहेत त्यापैकी मयत कावेरी ही दूसरी पत्नीला त्यांना 1 मुलगा व 1 मुलगी आहे. पहिली पत्नी सुनीता हिला 1 मुलगा 2 मुली आहेत. एवढा मोठा परिवार सुखी जीवन जगत असताना सोमवारी पती-पत्नी मध्ये झालेल्या किरकोळ वादावादीमुळे हा प्रकार घडल्याचे सासरचे मंडळीचा आरोप आहे. कावेरीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्यावर कावेरीच्या आई वडिलानी आमच्या मुलाचा विश्वास घात केला आहे, म्हणून हंबरडा फोडला. त्यांनी सासरच्या मंडळीवर आरोप केले. त्यावेळी पोलिसांनी त्यांची समजूत काढत तुम्हाला तक्रार करायचे असल्यास अवश्य करा म्हणून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी जतला हलविला. सांगली हून आलेले जीव रक्षक पथक प्रमुख महम्मद तांबोळी संतोष कुरने, गणेश कटुमनी, संभाजी पाटील, त्रिपाल मादराशी, इस्माइल अत्तार आदी मृतदेह बाहेर काढले यावेळी स पो नि सपांगे उपस्थित होते.अधिक तपास स .पो.उपनिरीक्षक सपांगे करीत आहे.
चौकट
पाण्यात बुडून चार जणाचा मुत्यू
जत पुर्व भागात यावेळी कधी नव्हे एवढा तुफान पाऊस पडल्याने विहिरे,नाले,ओढेपात्रे,तलाव भरून वाहत आहेत. त्यामुळे सर्वत्र विहिरी भरल्या आहेत. गेल्या पंधरवड्यात कोसारी येथील पुलावरून वैहून गेल्याने एका महिलेचा मुत्यू झाला होता, पाच दिवसापुर्वी संख येथे बोर नदी पात्रात पोहायला गेलेला एक शाळकरी मुलगा बुडून मृत्त झाला.सोमवारी मुंचडी येथे धुणे धुहत असताना पाय घसरून एका शाळकरी मुलीचा मुत्यू झाला आहे. तसेच सोमवारीच बालगांव येथील बुडून मुत्यूची चौथी घडना घटना घडली आहे.



