उमदी येथे डेंगू थैमान प्राथमिक आरोग्य केंद्र असून अडचण नसून खोळंबा,ग्रामपंचायत लक्ष देईना
उमदी येथे डेंगू थैमान
प्राथमिक आरोग्य केंद्र असून अडचण नसून खोळंबा,ग्रामपंचायत लक्ष देईना
उमदी,वार्ताहर:

उमदी येथे गेले महिन्याभरात सुमारे शंभरहुन अधिक जणांना डेंगू सदृष्य आजाराची लागण झाली आहे.मात्र याकडे लक्ष देण्यासाठी आरोग्य विभागाला वेळ नाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे .तर अनेक वेळा डॉक्टर नसल्याने रुग्णांना तासन तास ताटकळत बसावे लागत आहे.याकडे तालुका आरोग्य विभाग लक्ष देवुन येथील डॉक्टरांची कानउघडणी करावी अशी मागणी येथील नागरिक करत आहेत अन्यथा मोठ्या समस्येला सामोरे जावे लागेल.दिवसेंदिवस रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.येथील खाजगी दवाखान्यात रुग्णाला जागा अपुरी पडत आहेत.अनेक रुग्ण जत, सोलापूर , सांगली, विजापूर येथे उपचार घेत आहेत.झपाट्याने लाखो संख्येत पेशी कमी होत असून भीती निर्माण झाली आहे.असे असताना ना – ग्रामपंचायत ना- प्रशासन काडीमात्र काळजी घेताना दिसत नाही .उमदी ग्रामपंचायत कडून धुरची फवारणी करण्याची गरज आहे.मात्र यांना देखील याचा विसर पडला असल्याचे नागरिकातुन बोलले जात आहे .तसेच आठवड्यातून एकदा गावकऱ्यानी कोरडा दिन म्हणून पाळण्यासाठी जन जागृती होणे गरजेचे असून त्यासाठी ग्रामपंचायतीने पावले उचलण्याची गरज आहे.
आरोग्य केंद्राकडून घरोघरी सर्वे करून मार्गदर्शन करण्याची गरज आहे.मात्र शेकडो डेंग्युचे रुग्ण असताना ग्रामपंचायत व आरोग्य विभाग असलीही काळजी घेत नाही ही खेदाची आणि गंभीर बाब आहे.वेळीच उमदी ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाने दखल न घेतल्यास अत्यंत गंभीर परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे.त्यामुळे तात्काळ ग्रामपंचायत व प्रशासन , आरोग्य विभागासने पावले उचलावीत अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.