नाल्यात पडून शाळकरी मुलीचा मूत्यू

0

 नाल्यात पडून शाळकरी मुलीचा मूत्यू

जत, प्रतिनिधी:राणी भरत चव्हाण(वय-12, रा. तोळबोळवाडी,मुंचडी)ही शाळकरी विद्यार्थीनी नालाबांधात कपडे धुण्यासाठी गेली असता पाय घसरून पाण्यात पडल्याने मयत झाली. सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान घडली.जत पोलिसात याची नोंद झाली आहे. 

अधिक माहिती अशी,राणी,तिची आजी व काही मैत्रीणी दररोज प्रमाणे नालाबांधमध्ये कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या.  कपडे धुऊन झाल्यानंतर पाण्यात हातपाय धुत असताना पाय घसरून खोलगट भागात गेल्याने ती बुडाली. तिच्या मैत्रीणीनी आरडाओरडा केला मात्र बाजूस कोण नसल्याने मदतीला कोणीही आले नाही. त्यामुळे राणीचा बुडून मुत्यू झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.