जतेत 33 ग्रामपंचायतीची सत्ता कॉग्रेसकडे भाजपचा वारू थंडावला :स्थानिक आघाडीची 17 गावात सत्तास्थानी

0

जतेत 33 ग्रामपंचायतीची सत्ता कॉग्रेसकडे

भाजपचा वारू थंडावला :स्थानिक आघाडीची 17 गावात सत्तास्थानी 

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील ग्रामपंचायतीचा रणसंग्राम आज संपणार आहे. तालुक्याचे लक्ष लागलेल्या या निवडणूकीत पक्षीय राजकारण करणाऱ्या दलबदलू प्रवृत्तींना मतदारांनी रोकले आहे. मात्र काही गावात स्वच्छ प्रतिमेचे चेहरे आल्याने विकासाला चालना मिळणार आहे. अनेक गावातील प्रस्तापित बाहुबलींना यावेळी ग्रामपंचायतीत विरोधी पँनेलकडून दे धका देत धोबी पछाड केले आहे. तालुक्यातील संख,बाज,कुंभारी, येळवी, दरिबडची, हिवरे,पांडोझरी, अचकनहळ्ळी,वज्रवाड, लकडेवाडी,प्रतापपूर,आंसगीतुर्क,बसर्गी,आंवढी,लंवगाकरेवाडी,बागेवाडी, एंकुडी,बेवनूर ,कंठी, कासिलिंगवाडी, मध्ये सत्ताधाऱ्यांना मतदारांनी साफ नाकरले. तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपचे आमदार विलासराव जगताप व कॉग्रेस नेते विक्रम सांवत यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यात कॉग्रेसने बाजी मारत तालुक्यातील 35 ग्रामपंचायतीत सत्ता मिळवित स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीनंतर कमबँक केले आहे. तर भाजपला 23 ग्रामपंंचायतीत यश मिळाले आहे.

राष्ट्रवादी 2,जनसुराज्य 1 तर 17 गावात आघाडीचे संरपच निवडून आले आहेत. अत्यंत चुरसीने झालेल्या या निवडणूकीत भाजपला फटका बसला,तर राष्ट्रवादी कॉग्रेस, जनसुराज्यचा मोठी पिछेहाट झाली आहे. काही गावात थेट संरपच पदामुळे संरपच एका पक्षाचा व सदस्याची जादा संख्या विरोधी गटाकडे जादा झाल्याने कामकाजावर परिणाम होणार आहे. कॉग्रेस : लोहगाव, अंतराळ,तिल्याळ,कोसारी,करजगी,बनाळी,येळवी, आंवढी, दरिबडची, बसर्गी, दरिकोणूर, अचकनहळ्ळी, बेंळोडगी,मिरवाड, लकडेवाडी, वज्रवाड, सुसलाद,सोर्डी,नवाळवाडी,करेवाडी,धुळकरवाडी,खलाटी, एंकुडी, वाषाण, बेंळूखी,कोळगिरी, गुळवंची, येळवी, पांढरेवाडी,बालगांव, हळ्ळी,बागेवाडी, पाच्छापूर,पांढरेवाडी,बागलवाडी,भाजप : व्हसपेठ,खोजानवाडी,आंसगीजत,कुंभारी, रामपूर,बालगांव, सिंदूर, संख,देवनाळ,हिवरे,पांडोझरी, रेवनाळ,साळमळगेवाडी,मोटेवाडी,आक्कळवाडी,निगडी खुर्द, गोंधळेवाडी,बोर्गी बु.,कासिलिंगवाडी,जा. बोबलाद,सोन्याळ, कुणीकुणूर, कागनरी 

Rate Card

स्थानिक आघाडी :गिरगाव,प्रतापपूर, अमृत्तवाडी, खैराव,बिरनाळ,आंसगीतुर्क, वायफळ,लंवगा,शिंगणापूर, तिप्पेहळ्ळी,बेवनूर, जाल्याळ बु.,कंठी,डफळापूर,वाळेखिंडी,जिरग्याळ,माणिकनाळ,राष्ट्रवादी : अमृत्तवाडी, प्रतापवाडी,जनसुराज्य : खंडनाळ

Displaying IMG_20171017_132448.jpg

निकाल ऐकण्यासाठी झालेली मोठी गर्दी 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.