उमेदवांराचे दिवाळे ग्रामपंचायत निवडणूक ; मतदानापूर्वी उमेदवारांना हात थोडा ‘ढिला’ करण्याची वेळ

0

उमेदवांराचे दिवाळे

ग्रामपंचायत निवडणूक ; मतदानापूर्वी उमेदवारांना हात थोडा ‘ढिला’ करण्याची वेळ

Rate Card

जत,प्रतिनिधी: ऐन दिवाळीत जत तालुक्यातील 81 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असल्याने या निवडणुकीत काही मतदारांची ‘दिवाळी’ तर उमेदवारांचे ‘दिवाळे’ निघणार आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना सर्वात जास्त  फटका बसण्याची शक्यता आहे. दिवाळी सण बुधवारी 18 ऑक्टोबरला तर मतदान 16 ऑक्टोबरला आहे. मध्ये एकच दिवस शिल्‍लक असल्याने मतदानापूर्वी उमेदवारांना हात थोडा ‘ढिला’ सोडावा लागणार आहे.  दिवाळीला लागणार्‍या वस्तूंचा खर्च आपल्यालाच करावा लागण्याची मानसिक तयारी उमेदवारांनी आता केली आहे.अगदी उच्च शिक्षितापासून सामान्य जनतेपर्यत अपेक्षा ठेवत असल्याने उमेदवारांची अग्निपरिक्षा सुरू आहे. सदस्य म्हणून निवडणूक लढविण्यार्‍या उमेदवारांना त्या तुलनेत खर्च कमी येणार असला तरी सरपंचपदाची निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांचे मात्र चांगलेच दिवाळे निघणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर दिवाळी असली तरी तत्पूर्वी नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. या नवरात्रौत्सवात मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुकांकडून वर्गणी देण्याची तयारी सुरू केली आहे. 7 ते 9 सदस्य असणार्‍या ग्रामपंचायतींसाठी खर्च मर्यादा 25 हजार तर सरपंच पदसाठी ही 50 हजार राहणार आहे. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ ऑक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 यादरम्यान संपुष्टात येत आहे. यासर्व ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. 14 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये 81 ग्रामपंयायतीचा समावेश आहे़.  या निवडणुकीमध्ये प्रथमच थेट पद्धतीने सरपंच निवडला जाणार आहे. सार्वत्रिक निवडणुकांप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकांनाही विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे यापूर्वी अनेक ग्रामपंचायती एकीच्या बळावर बिनविरोध निवडून येत होत्या. मात्र आता ‘इलेक्शन फिवर’ असल्याने जवळपास सर्वच गावात दुरंगी तिरंगी चौरंगी लढती होत आहेत. सरपंचपदासाठी नवखा व अभ्यासू उमेदवार मैदानात उतरवले आहेत. थेट सरंपच निवड असल्याने गावाचा विचार करुन उमदेवार देण्यात आले आहेत. आजचा एकच दिवस उरल्याने हवी ती शक्ती खर्च करण्याची तयारी उमेदवांरानी केली आहे. त्यामुळे घरी मतदानाचे दर निश्चित झाल्याची चर्चा आहे. आजची रात्र महत्वपुर्ण असणार आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.