भाजप सरकारमुळे संखची राज्यात ओंळख

0

भाजप सरकारमुळे संखची राज्यात ओंळख

संख,वार्ताहर : गेली पंचवीस वर्षे सत्ता देऊनही संखचा विकास साधता आला नाही. भाजप सरकारमुळे संखची राज्यात ओंळख झाली आहे. त्यामुळे जनतेला भुलवून सत्ता मिळविण्याच्या प्रवृत्तींना रोका,जिल्हा परिषद,पंचायत समिती,सोसायटी निवडणूकीतील विजयाची पुर्नावर्ती करा व

घाणेघाण संखला नवी दिशा देण्यासाठी भाजप प्रणित गुरूबसव ग्राम विकास परिवर्तन पँनेलला विजयी करा असे प्रतिपादन आमदार विलासराव जगताप यांनी केले. ते संख येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते.

यावेळी भाजप नेते डॉ. रविंद्र आरळी, माजी सभापती आर. के.पाटील,जिल्हा परिषद सदस्या रेखा बागेळी, पंचायत समिती सदस्या कविता खोत,कॉग्रेस, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, व अपक्ष उमेदवार उपस्थित होते.

Rate Card

डॉ.रविंद्र आरळी म्हणाले, गेली पंचवीस वर्षे एकाकडे सत्ता देऊन मतदारांनी संखला पंचवीस वर्षे मागे ठेवले आहे. सत्तेसाठी सतत दिशा बदलणाऱ्या यावेळी घरी बसवा.भाजप्रणीत विकासाचे व्हिजन असलेल्या गुरूबसव पँनेलच्या सर्व उमेदवार संखचा कायापालट करतील.

फोटो :

संख येथील जाहिर सभेत बोलताना आमदार विलासराव जगताप, डॉ. रविंद्र आरळी, आर. के. पाटील व मान्यवर

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.