पाणी योजना,लोकहिताच्या कामाला आडकाठी घालणाऱ्यांना घरी बसवा मन्सूर खतीब : मोठी विकास कामे केली म्हणूनच आरोपाला जागा.
पाणी योजना,लोकहिताच्या कामाला आडकाठी घालणाऱ्यांना घरी बसवा
मन्सूर खतीब : मोठी विकास कामे केली म्हणूनच आरोपाला जागा.

डफळापूर,वार्ताहर : डफळापूर पेयजल पाणी योजनेला अडकाठी घालून मतलबी राजकारण करणाऱ्या दलबदलू प्रवृत्तींना रोका असे प्रतिपादन माजी सभापती मन्सूर खतीब यांनी केले.
ते डफळापूर येथील क्रांती बहुजन विकास पँनेलच्या प्रचारार्थ सभेत बोलत होते. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सज्जनदादा चव्हाण, बाजार समिती संचालक विलास माने,जे के माळी,बाळासाहेब पाटील, माजी संरपच शिवदास शांत आदि मान्यवर उपस्थित होते.
खतीब पुढे म्हणाले, डफळापूरची सततची पाणी मागणी पुर्ण व्हावी म्हणून मी सभापती असताना स्वर्गीय सुनिलबापू चव्हाण यांच्या प्रयत्नातून मंजूरी केली होती. काम जवळपास आंशी टक्के काम पुर्ण आहे. योजना रखडावी म्हणून व्यक्तिगत फायद्यासाठी घरभेदीनी अंनत तऱ्हेंने विरोध केला.तरीही योजनेचे काम आम्ही अंतिम टप्यात आणले आहे. त्या कोणताही भष्ट्राचार झाला नाही. त्याची तपासणी झाली आहे. गेल्या वर्षभरात ग्रामपंचायतीकडून झालेली विकास कामे नियमाप्रमाणे झाली आहेत. त्याचीही चौकशी झाली.त्यात जनतेला वेटिस धरून मतलबी राजकारण करणारे तोंडघसी पडले आहेत. आरोप करणाऱ्यांनी विकास कामाला अडवून स्वत:साठी कामे करून घेतली आहेत.कोणी शासकीय योजनेचा स्वत:साठी फायदा करून घेतला हे जगजाहीर आहे. आम्ही मोठ्या प्रमाणात कामे केली म्हणून आरोप होत आहेत. त्यामुळे विकासकामे झालेत हे सिध्द आहे. यापुर्वीच्या व आता विरोधातून आरोप करत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी विकासकामे कशी केली आहेत. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आम्ही विकासासाठी निवडणूक रिंगणात उतरलो आहोत. आमचे सर्व उमेदवार सक्षम आहेत. त्यामुळे विखारी आरोप सुरू आहेत. त्याला मतदारांनी बंळी पडू नये असे आवाहन शेवटी खतीब यांनी केले.