सत्ताधाऱ्यांच्या नेतृत्व न मानण्याची प्रवृत्तीं खटकली म्हणून वेगळी भूमिका घेतली : शंशिकात जाधव

0

सत्ताधाऱ्यांच्या नेतृत्व न मानण्याची प्रवृत्तीं खटकली म्हणून वेगळी भूमिका घेतली : शंशिकात जाधव

दहा वर्षापासून माझ्या लोकमताचे वापर केला,मी विरोधात जाताच अस्पर्ह वाटू लागलू आहे.

डफळापूर :

शहरात काम करताना,सर्वत्र झालेली प्रगती,विकास बघून माझी मायभुमी असणाऱ्या बेंळूखीतही असेच का घडत नाही. म्हणून मनाला खंत वाटायची,यातून गावच्या विकासासाठी माझी तळमळ मला गप्प बसू दिली नाही. बेंळूखीच्या खुंटलेला विकासासाठी मी दहा वर्षापासून ग्रामपंचायत निवडणूकीत माध्यमातून समाजसेवेला सुरूवात केली. तत्कालीन कॉग्रेस प्रणित पँनेलचे नेतृत्व करत माझे लोकमत व समाज हिताचे व्हिजन समोर ठेऊन ग्रामपंचायतीवर सत्ता आणली. ती सलग दोन टर्ममध्येही कायम राहिली. या काळात कोणताही स्वार्थ न करता गावचा विकास व्हावा म्हणून आमच्या पँनेलच्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांना स्वच्छ मनाने सत्तापदे देत जबाबदारी दिली.मी माझ्या व्यवसायाचा भार संभाळत बेंळूखीत विकास योजना खेचून आणून दिल्या. विकासासाठी प्रंसगी खिशातील पैसे घालून पदाधिकाऱ्यांचे मनोबल वाढविले. ग्रामपंचायत कामकाजात कधी हस्तक्षेप किंवा ढवळाढवळ केली नाही.फक्त योजना सुचविल्या. आमच्या पुढाकाराने बसलेल्या पदाधिकाऱ्यांना मोकळेपणाने विकास कामे करण्याची संधी दिली.मात्र सत्तेच्या धुदींत आम्हीच सत्तापदे दिलेले आमच्या नेतृत्वाला आवाहन देऊ लागले. सत्तेतून आलेल्या पैशातून त्यांना पँनेल निवडून आणताना केलेल्या माझ्या संघर्षाचा विसर पडला.भष्ट्र कारभार करून मिळविलेल्या पैशातून माझ्या विरोधात घरभेदीची साखळी तयार झाली. सत्ता मिळविताना आम्ही दिलेल्या आश्वासनाची परताना करताना सत्तेची चव लागलेली मंडळी आम्हाला वगळून निर्णय घेऊ लागले. त्यातून माझ्या बेंळूखीच्या विकास व्हिजनचा विसर पडला. ग्रामपंचायती वर असलेल्या निर्विवाद सत्तेचा वापर करून केलेल्या योजनेत मोठा भष्ट्राचार करून स्व:ताची पोट भरली. हा सर्व प्रकार सहन न झाल्याने व माझ्या नेतृत्वाला आवाहन देणाऱ्या प्रवृत्तींना  कंटाळून मी विरोधात निवडणूक लढवित आहेत. मी विरोधात जाताच माझ्या लोकमत,आर्थिक,सामाजिक व समाजातील वलयं सत्ताधारी गटाला अस्पर्ह वाटू लागले आहे. मी नेतृत्व करताना चांगला होतो. आता माझ्या विषयी खोटे-नाटे सांगून अप्रचार करून फक्त स्वार्थासाठी विरोध करत आहेत. प्रत्यक्षात माझे लोकहिताच्या कामामुळे माझ्या बरोबर मोठा जनसमुदाय आहे. मतलबासाठी विखारी राजकारण करणाऱ्या विरोधात लढा उभारला आहे.माझे मित्र बेंळूखीतील राजकीय क्षेत्रातील दुुुसरे ताकतवान व्यक्तिमहत्व सुधाकर माळी सह त्यांच्या समर्थक पँनेलबरोबर युती करून आम्ही बेंळूखीत सिध्दनाथ व संदानंद बहुजन ग्रामविकास पँनेल उभे केले आहे. त्यात माझे वडील धोंडिराम जाधव यांना निवडणूकीच्या रिंगणात उतरविले आहे. शिवाय सदस्य पदासाठी सदाशिव उत्तम चंदनशिवे, भारती सदाशिव अथणी, कल्पना रमेश चव्हाण, अशोक सावळा माळी, शांताबाई विठोबा चव्हाण, आप्पासो रामू चव्हाण, मायाक्का सुरेश शिंगाडे, कमल संभाजी चव्हाण, विलास मारूती बाबर असे तुल्यबंळ उमेदवार उभे केले आहेत.गेल्या दहा वर्षात बेंळूखीत सर्वकाही सत्ता हातात असतानाही अपेक्षीत विकास साधता आला नाही.करण निवडणूकीतील विजया नंतर मला वगळून राजकारण केल. आम्ही खुडचीवर बसविलेल्या पदाधिकाऱ्यांनी कधीही गावातील सर्वसामान्य लोंकासाठी सत्तेचा वापर न करता स्वत:चा हितासाठी वापर केला. गेल्या दहा वर्षातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी व माझ्या नेतृत्वाला आवाहन देणाऱ्या प्रवृत्तींना रोकण्यासाठी  बेंळूखीतील तमाम मतदारांनी आमच्या पँनेलवर  विश्वास दाखवून आमच्या पँनेलमधील सर्व उमेदवारांना बहुमतांनी विजयी करा असे आवाहन शेवटी जाधव यांनी केले.सत्ताधारी मंडळींनी *पेग्विन ब्लॉकची मोठी कामे करून मोठा गफला करून मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार केला.*बंधारे बांधकामात मक्तेदारी करून वाटून घेतलेल्या कामातून लाखोची कमाई केली* व्यायाम शाळेसह सर्व बांधकामे दर्जाहीन केली. त्याचेच उदाहरण नव्याने सहा मिहिन्यापुर्वी बांधलेली व्यायाम शाळेच्या काही भिंती कोसळण्याच्या स्थितीत आहेत.* पाणी योजना दुरूस्थी साठी कोणतीही दुरूस्थी न करता वर्षाला हाजारो रूपये बोगस बिले जोडून काढले.

Rate Card

* गावात बसविलेल्या एलईडी दिव्यात दर वाढवू जादा पैसे काढले.*पाणी फांऊडेशन काम सामुहिक व अनेकाच्या पुढाकाराने केले,श्रेय मात्र स्वत: घेतायत.

*अनेक ठिकाणचे पेग्विन ब्लॉक, सिमेंट कॉक्रीटचे रस्ते पहिल्याच पावसात उखडेल आहेत.लोकहो तुम्हीच ठरवा कसा विकास केला.*दहा वर्षात जनेतचा भम्रनिराश केला आहे.* विकास केला म्हणाऱ्यांनी त्याच्यांच सत्तेतील एका सदस्याला विकासाचे एक काम दिले.मंजूर केलेल्या रक्कमेतही हात मारला.आम्ही सत्तेसाठी नाही. जनहितासाठी काम करत आहोत.म्हणून आम्हच्याकडे मोठा जनसमुदाय आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित अाहे. असेही जाधव यांनी स्पष्ट केले. 

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.