डफळापूर,संख,येळवी माडग्याळमध्ये तुल्यबंळ लढती

0

डफळापूर,संख,येळवी माडग्याळमध्ये तुल्यबंळ लढती

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील डफळापूर,संख,येळवी माडग्याळ ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये तुल्यबंळ लढती होत आहेत. तालुक्याचे नेते असणाऱ्या राजकीय ऩेत्यानी प्रतिष्ठेसाठी गावात ठाण मांडून रात्रीचा जागर सुरू केला आहे. जत तालुक्यातील राजकारण महत्वपुर्ण भूमिका बजावणारे जिल्हा परिषद उपाध्यक्ष बसवराज पाटील, माजी सभापती आर. के. पाटील, मन्सूर खतीब,बाजार समिती सभापती अभिजित चव्हाण, दिग्विजय चव्हाण, आर. के. माने व भाजपच्या एका पहिल्या फळीतील नेत्यांने आपले बालेकिल्ले आबाधित ठेवण्यासाठी सर्व नितीचा वापर सुरू केला आहे. त्याच गावात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मोठे जनमताचा फायदा घेत विरोधकांनी मोठे आवाहन उभे केले आहे. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणूकीत कोणाला दणका बसणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Rate Card

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.