गावचा विकासासाठी आलेला निधीतून स्व: विकास करत नागरिकावर घराणेशाही लादणाऱ्या प्रवृत्तींना बाजूला बसवा
डफळापूर : शिंगणापूर अगदी महाराष्ट्र व कर्नाटक सिमेवर वसलेले गाव,चांगली काळीभोर जमिन तरीही पिके नाहीत. सतत सत्ता असूनही शेतकऱ्यांना सह नागरिकांना पाण्यासाठी मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. विकासाचा नुसता डंका वाजवुन स्व:चा विकास साधून गावाला विकास प्रवाहापासून बाजूला ठेवणाऱ्या, कायम घराणेशाही लादणाऱ्या सत्ताधारी प्रवृत्तींना संपविण्यासाठी आम्ही फक्त जनतचा विकास,लोकहिताची ग्रामपंचात व युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्धं करून देण्यासाठी ग्रामपंचात निवडणूकीच्या मैदानात जय हनुमान शेतकरी परिवर्तन पँनलच्या माध्यमातून उतरलो आहोत.शिंगणापूरच्या विकासासाठी आमच्या पँनेलला प्रंचड बहुमतांनी विजयी करा असे आवाहन पँनेल प्रमुख दादाशेठ पांढरे व आबासाहेब पांढरे यांनी केले.
शिंगणापूरच्या इतिहास बदलण्यासाठी आम्ही काम करत आहोत. आतापर्यत घरात ग्रामपंचायत,सोसायटी,जिल्हा परिषद सदस्या पदे असतानाही गावाचा विकास विरोधाकांना साधता आला नाही.मात्र सत्तापदे भोगताना स्वता:ची पोट भरण्याचा करेटं कार्यक्रम विरोधातील एकट्या बहादराने केला. गावात रस्ता झाला,ते अल्पजिवी ठरले,पुन्हा खड्डे भरले ते दगडे व रॉकेल मिश्रित डांबराने,तेही महिन्यातच उचटले,डबरी पडली. निधी मात्र खर्च झाला. गावासाठी दोन कोटी रुपयाची भारत निर्माण पाणी योजना पुर्ण झाली आहे. दोन टाक्या दिसतात. करोडो रुपयाचा निधी खर्चूनही नागरिकाना पिण्याच्या पाण्यासाठी दरवर्षी मरणयातना सहन करण्याची वेळ आली.विकास नव्हे शिंगणापूरला भकास केले. गावात ब्लॉक बसविले,कसे बसविले हे तर एका पावसातच स्पष्ट झाले आहे. त्या कामात मोठा घोटाळा झाला आहे. शाळा खोल्या,ग्रामपंचायत इमारत,अन्य सर्व विकास कामात फक्त कागदपत्री मेळ घालून प्रत्यक्षात दर्जाहीन कामे करत स्वत:चा मोठा विकास विरोधाकांनी केला आहे. कोणतीच कामे सध्यस्थितित व्यवस्थित किंबहुंना अनेक कामे कागदपत्री दाखविली गेली आहेत. का़यम लोकांना भुरळ घालून मतलबी राजकारण केले गेले. सत्ता आपल्याच घरात राहावी यासाठी आपली माणसे निवडणून आणली. त्या जनतेचे हित कधीच पाहिले नाही.दोन कोटी रुपयाची भारत निर्माण योजनेचे दर्जाहीन व विउपयोगी टाकी हेच गावाच्या वेशीपासून सत्ताधाऱ्यांचा काळ्या कारभारचे चित्र स्पष्ट होते. अशा स्वार्थी सत्ताधाऱ्यांच्या उलथून टाकून पारदर्शी लोकहिताचा कारभार करण्यासाठी आमचे पँनेलच्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी विजयी करा. असे आवाहन पँनेल प्रमुख दादाशेठ पांढरे व आबासाहेब पांढरे यांनी केले.
आम्ही सांगत नाही फक्त लोकहिताची कामे करतो.
गत दोन वर्षापासून आम्ही राजकीय जिवनात काम करत आहोत. पैसा हा आमचा बाणा नाही. शिंगणापूरला बदलायचे आहे. सर्वागिंन विकासासाठी आमचे उमेदवार मैदानात आहेत. कोणतीही घराणेशाही अथवा मतलबी राजकारण आमच्या कडून होणार नाही. गावचा नावलौकिक वाढवायचा आहे. दर्जेदार विकास साधण्यासाठी आम्ही काम करत आहोत. त्याच धर्तीवर गावातच एक दुधडेअरी सुरू करून नव्या पर्वाला सुरवात केली आहे. सध्या आम्ही गावातील पन्नासवर बेरोजगार युवकांच्या हाताला काम दिले आहे. शिवाय अप्रत्यक्ष 400 शेतकऱ्यांना उभारणीचे काम आमच्या डेअरीच्या माध्यमातून सुरू आहे.पुढेही अनेक रोजगार संधी आम्ही शिंगणापूरात उभ्या करणार आहोत. शिवाय जनहितासाठी सदैव कठिबंध्द असणार आहोत.