वाळूच्या ट्रकचा मध्यरस्त्यात एक्सल तुटल्याने वाहतूक खोळबंली पुन्हा ओव्हरलोड वाहतुकीचा प्रश्न चव्हाट्यावर : पोलीस,आरटीओ व महसुल प्रशासनाचे दुर्लक्ष

0

वाळूच्या ट्रकचा मध्यरस्त्यात एक्सल तुटल्याने वाहतूक खोळबंली 

पुन्हा ओव्हरलोड वाहतुकीचा प्रश्न चव्हाट्यावर : पोलीस,आरटीओ व महसुल प्रशासनाचे दुर्लक्ष

उमदी,वार्ताहर :उमदी (ता.जत) येथे कर्नाटकातुन ओव्हर लोड वाळू घेऊन जाणाऱ्या विना नंबरच्या ट्रकचे डाव्या बाजूच्या चाकाचे एक्सल तुटुन ट्रक रस्त्याच्या मधोमध बंद पडल्यामुळे उमदी -मंगळवेढा व उमदी चडचण या महामार्गावर वाहतूक खोंळबली होती.त्यामुळे या मार्गावर वाहतूक काही पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती.तर उमदी -चडचण या मार्गावरील सर्व सर्व वाहने गावातील अन्य मार्गावरून वळवण्यात आली होती.या राज्य महामार्गावरून वाळूची ओव्हर लोड वाहतूक पोलिस स्टेशन समोरून आरटीओ,महसूल प्रशासनाच्या नाकावर टिचून मोठ्या प्रमाणात वाहतूक चालू अाहे. आंतरराज्यीय या रस्त्यावर एक ही टोलनाके नसल्याने व चोरटी मोठ्या प्रमाणात चालू असते. अवैध व ओव्हर लोड वाहतुकमुळे रस्त्याची दैना झाली आहे.या जिवघेणी वाहतूक रोखण्याचे धाडस उमदी पोलिसांकडून होत नाही हे विशेष..उमदी -मंगळवेढा व उमदी -चडचण  या मार्गावर दररोज हजारो वाहने ये जा करीत असतात.या घटनेमुळे मात्र वाहन धारकांतून व प्रवाशी वर्गातुन संताप व्यक्त करत आहेत.मात्र या सततच्या होणाऱ्या या घटनेकडे संबधित अधिकाऱ्यानी व विभागानी वेळीच लक्ष घालावे अशी मागणी जनतेतून होत आहे.

Rate Card

   ——चौकट मध्ये —-

उमदी पोलीस ठाणे अंतर्गत कों.बोबलाद (ता-जत) येथे चेक पोस्ट आहे. तोविस तास तेथे पोलिस तैनात असतानाही ओव्हरलोड बेकायदा वाळू तस्करीचा येतो. तो पुढे उमदीतील पोलिस ठाण्यासमोर पुढे जातो तरीही उमदी पोलिसाचे लक्ष नसतेे. अशा प्रकारे या मार्गावर जिवघेणी वाहतूक पोलिसाच्या अर्थपुर्ण तडजोडीने राजरोस पणे सुरू आहे.आरटीओ यंत्रणा जत तालुक्या ढिम्म दिसते आहे. उमदी परिसरात आरटीओ फिरकत नसल्याचे आरोप होत आहे.किंबहुंना त्यांनाही अर्थपुर्ण सहयोग इकडे यायला अटकाव करत असल्याचे आरोप होत आहेत.  

विजापूर- पंढरपूर मार्गावर मध्य रस्त्यात एकल्स तुटल्याने वाळूचा ट्रक उभा होता.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.