लोकहिताच्या योजना तळापर्यत पोहचविण्यासाठी गुरूबसव पँनेला विजयी करा

0

लोकहिताच्या योजना तळापर्यत पोहचविण्यासाठी गुरूबसव पँनेलला विजयी करा

संख,वार्ताहर : 8 कोटीची भारत निर्माण पाणी योजना मंजूर झाली. योजनेचे कामही काही प्रमाणात झाले. मात्र हुकूमशाहीने निधी अडवून योजना रखडविली. परिणामी नागरिकाना दरवर्षीच्या दुष्काळात 

पिण्याच्या पाण्यासाठी मरणयातना भोगण्याची वेळ आणलेल्या सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवा. विकासाच्या नुसत्या गप्पा मारून मतलबी राजकारणाविरोधात आम्ही मैदानात आहोत.त्यामुळे गुरूबसव पँनेलच्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी विजयी करा असे आवाहन माजी सभापती आर. के. पाटील यांनी केले. त्यांनी संखसह वाड्यावस्त्यांना भेटी देत मतदारांशी संवाद साधला.

पाटील पुढे म्हणाले, सध्या देश, राज्य,जिल्हा, तालुक्यापर्यत भाजपचे शासन आहे. त्यामुळे विकास कामाचा डोंगर उभा राहिला. लोकहिताच्या योजना गावापर्यत आणण्यासाठी भाजप प्रणित पँनेलला विजयी करा. गेल्या अनेक वर्षापासून सतत सत्ता मिळवत संखला विकास पासून कोसोदूर ठेवले. निवडणूक येताच विकास कामाची आठवण झाली. तीही दर्जाहीन करून फक्त दिखावा केला गेला आहे. संखच्या गावभागासह वाड्यावस्त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गावात अनेक ठिकाणी व्यवस्थित रस्ते,गटारी नाहीत. स्वच्छालय,बसस्टँड नाही.अनेक ठिकाणी सुविधाचा वणवा आहे. दंडेलशाही दाखवून सत्तेचा दुरूउपयोग करून विरोधकांना ग्रामपंचायतीला विकलांग केले आहे. त्यामुळे जनहितासाठी यावेळी ग्रामपंचात निवडणूकीत परिवर्तन करा. विकास कसा असतोय हे आम्ही दाखवितो.भविष्यातील तालुक्याच्या संखला तालुक्याच्या तोडीचे शहर बनवू,अत्याधूनिक सुविधा आणून संख तालुक्यात आदर्श गाव करू असे प्रतिपादन पाटील यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.