ग्रामविकास शेतकरी पॅनलच्या प्रचाराचा नारळ फुटला

0

ग्रामविकास शेतकरी पॅनलच्या प्रचाराचा नारळ फुटला 

ग्रामविकास शेतकरी पॅनलच्या प्रचाराचा नारळ फुटला 

माडग्याळ,वार्ताहर;माडग्याळ (ता. जत) येथील ग्रामपंचायत निवडणूकीतील ग्रामविकास शेतकरी पॅनलच्या तिस-या आघाडीकडून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. प्रचाराच्या शुभारंभास ग्रामस्थाकडून मोठा प्रतिसाद मिळाला. 

          माडग्याळ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीत तिसऱ्या आघाडीने मोठे आवाहन उभे केले आहे. आघाडीकडून थेट सरपंच पदासाठी व सहा सदस्यांसाठी निवडणूक लढविण्यात येत आहे. बरबटलेल्या राजकारण व ग्रामपंचायतमधील सावळा गोंधळ थांबणे गरजेचे असल्याने व गावचा सर्वांगिण विकास हा मुद्दा समोर ठेवून गावातील तरूणांनी निवडणूकीसाठी रणशिंग फूकंले आहे. त्यानिमित्ताने सोमवारी प्रचाराचा नारळ विविध मान्यवराच्या उपस्थित मोठ्या जोमात फोडण्यात आला.

Rate Card

     यावेळी नंदयाप्पा कोरे, मुरलीधर कसबे, गुराप्पा कोरे, अंबव्वा माळी, शशिकला माळी, भरमव्वा बंडगर, पारव्वा माळी, सायंव्वा जिगजेणी, दुंडप्पा कोरे,कलाप्पा माळी (सातापगोळ), श्रीशैल माळी, चनाप्पा माळी, विद्यमान पंचायत समिती सदस्य विष्णू चव्हाण, लिंबाजी माळी, कांतू माळी, सुखदेव माळी, सदाशिव माळी, श्रीमंत कोरे, दत्ता सोलनकर, बाळू रूपनूर, आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.