राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे दिपावलीसाठी बिलाची रक्कम प्रतिटन रुपये २७५/- प्रमाणे बॅक खात्यावर जमा

0

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे दिपावलीसाठी बिलाची रक्कम प्रतिटन रुपये २७५/- प्रमाणे बॅक खात्यावर जमा

Image result for कारखाना

इस्लामपूर, (प्रतिनीधी);

Rate Card

    राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे साखराळेवाटेगावसुरुल व कारंदवाडी युनिटकडे गळीत हंगाम २०१६२०१७ मध्ये गळीतास आलेल्या ऊसास प्रतिटन रुपये २७५ प्रमाणे होणारी ऊस बिलाची रक्कम रुपये ३६ कोटी ६१ लाख रुपये ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्याच्या बॅक खात्यावर जमा केली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पी. आरपाटील यांनी दिली. 

    कारखान्याने गळीत हंगाम २०१६१७ मध्ये गळीतास आलेल्या ऊसास प्रतिटन पाहिला हप्ता रुपये २७९०/- दिला होतादुसरा हप्ता रुपये १५०/- या पुर्वी अदा केलेला आहेतसेच दिपावलीसाठी प्रतिटन रुपये २७५/- प्रमाणे दिनांक ९ ऑक्टोबर २०१७ रोजी बॅकेत वर्ग केलेला आहेगळीत हंगाम २०१६२०१७ मधील गळीतास आलेल्या ऊसास प्रतिटन रुपये ३२१५/- ऊस उत्पादकाना दिलेले आहेत. तसेच कारखाना सभासदाना ऑक्टोबर महिन्यापासून रुपये २ या दराने ७ किलो व दिपावलीस ७ किलो साखर सभासदाना कारखान्याने चालू केली आहेऊस उत्पादक शेतकऱ्यानी आपला सर्व ऊस कारखान्यास पुरवठा करावा असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष पीआरपाटील यांनी केलेयावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटीलसंचालक सर्वश्री विराज शिंदेश्रीकांत कबाडे, दिलीप पाटील, एटीपाटीलकार्यकारी संचालक आरडीमाहुली सचिव प्रतापराव पाटीलचिफ अकोंटट अमोल पाटीलव्यवस्थापकीय आधिकारी व्हीबीपाटील उपस्थित होते.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.