विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती..माडग्याळमधील कार्यकर्त्याची आवस्था ; तिंरगी लढतीचे नेत्यांची तयारी,मात्र संभ्रम कायम

0
Post Views : 1 view

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती..

Image result for pandharpur wari

माडग्याळमधील कार्यकर्त्याची आवस्था ; तिंरगी लढतीचे नेत्यांची तयारी,मात्र संभ्रम कायम


माडग्याळ,वार्ताहर : माडग्याळ (ता.जत) येथील ग्रामपंचायत निवडणूक महाआघाडीत फुट पडल्याने सुरुवातीस दुरंगी वाटणारी लढत आता तिरंगी होणार आहे. त्यामुळे मतदारांना आपला पसंतीचा उमेदवार निवडण्यासाठी चांगला पर्याय उपलब्धं झाले आहेत. बऱ्याच चर्चा व बैठकीनंतर अखेर महाआघाडीत फुट पडली,जमलेली तयारी विस्कटल्याने तिंंरगी सामना होत आहे. दरम्यान नेते स्वंतत्र लढत असताना कार्यकर्त्यांच्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती अशी काहीशी परिस्थिती उद्भविली आहे.माडग्याळ ग्रामपंचायत निवडणूक सुरुवातीस दुसरी आघाडी विरुद्ध महाआघाडी अशी होणार होती. मात्र महाआघाडीचा थेट सरपंच पदाचा उमेदवार निवड झाल्यानंतर गावातील काही नेत्यांना निर्णय मान्य नसल्याने महाआघाडीत फुट पडली आहे. त्यातून बाहेर पडत आप्पू माळी( जत्ती) यांनी नाराज व अपक्ष उमेदवारांची फळी निर्माण करीत आपला स्वतंत्र पॅनेल तयार केला असल्याने आता हि लढत तिरंगी होणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे आता जनता कुणाला सरपंच पदाचा मुकुट घालणार हे पाहणे कुतुहलाचे ठरणार आहे. सरपंच पदाचे तिन्ही उमेदवार तुल्यबळ असल्याने जनतेचे चांगलीच कसोटी लागणार आहे. सरपंच पदाच्या उमेदवारीत आप्पू माळी (जत्ती), बाळाप्पा माळी( कोरे), व दुसऱ्या आघाडी कडून महादेव माळी (सावकार) हे निवडणूक लढवित आहेत. यामध्ये बाळाप्पा माळी यांनी ऐन दुष्काळात जनतेला स्वखर्चाने पाण्याचे वाटप केले आहे. त्यामुळे त्यानाही जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आप्पू जत्ती यांनी विविध सामाजिक कार्यक्रमात आपला सहभाग दिला आहे. मग ते गणेश चतुर्थी असो व नवरात्र उत्सव असो नेहमीच त्यांनी आपला सहभाग दर्शविला आहे. त्यामुळे त्यांचाही जनमानसातून चांगली प्रतिमा आहे. महादेव माळी शेतकऱ्यांना आपल्याकडे असलेले शेतीविषयक ज्ञान इतरांना देत असल्याने यानाही समाजातील विविध घटकातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. एक उच्चशिक्षित तसेच एक प्रगत शेतकरी म्हणून व माळी कृषी सेवा केंद्राकडून त्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांची वेळोवेळी मदत केली आहे. आपले दुकान ते शेतकऱ्यांचे बांदापर्यत त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून त्यांना पसंती मिळत आहे. त्यामुळे समाजात तिन्ही उमेदवारांनी आपआपले महत्वपूर्ण योगदान दिले आहे. यातून नेमका विजय कुणाचा होणार हे आताच सांगणे अतिघाई ठरणार आहे. त्यामुळे सोमण्णा हाक्के यांच्यासाठी हि लढत प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे माडग्याळ ग्रामपंचायत निवडणूक विशेष ठरणार आहे.सरपंच पदाच्या तिन्ही उमेदवारांनी आपलाच विजय होणार हे गृहीत धरून कंबर कसली असली तरी शेवटी मतदारच आपला निर्णायक मत देऊन यातून एका उमेदवाराला सरपंच पदाच्या खुर्चीवर बसविणार आहे. त्यामुळे मतदारांच्या मनात उतरण्याचे काम या उमेदवारांना करावे लागणार आहे. येणाऱ्या पाच वर्षात गावासाठी काय करणार याचा अजेंडा जनतेसमोर मांडावा लागणार आहे. थेट जनतेतून निवड होणाऱ्या सरपंचाला विशेष अधिकार असल्याने व सरपंचालाच गावाचा अर्थसंकल्प मांडावा लागणार असल्याने जनतेला एक सक्षम सरपंच गावाला द्यावा लागणार आहे. त्यामुळे यातून आता माडग्याळमधील सुज्ञ जनता या कामासाठी कोणत्या उमेदवाराची निवड करते हे पाहणे कुतुहलाचे ठरणार आहे. 

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.