शेतकरी संघटना संख शाखेचा गुरूबसव ग्राम विकास परिवर्तन पँनेलला पांठिबा

0
Rate Card

शेतकरी संघटना संख शाखेचा गुरूबसव ग्राम विकास परिवर्तन पँनेलला पांठिबा

 

संख,वार्ताहर : संख ग्रामपंचायत निवडणूकीतील आर.के. पाटील यांच्या नेतृत्वाखालील गुरूबसव ग्राम विकास परिवर्तन पँनेलला शेतकरी संघटनेचे नेते तथा सोसायटीचे चेअरमन भाऊराया बिराजदार सह संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यानी बिनशर्त पांठिबा दिला. यामुळे ग्राम विकास परिवर्तन पँनेल मजबूत झाले आहे.माघारीपुर्वी शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्याचे मनोमिलन होणार होते. मात्र काही जागा बाबत एकमत न झाल्याने बोलणी फिस्कटली होती.त्यामुळे शेतकरी संघटनेचे काहीजण रिंगणात होते. तरीही आर. के. पाटील यांच्या कडून बोलणी सुरू होती. अखेर रविवारी त्याला यश आले. शेतकरी संघटनेचे नेते भाऊराया बिराजदार यांनी पुढाकार घेत चर्चा घडवून आणत एकमत घडविले. व आर.के.पाटील यांच्या नेतृत्वाखालील गुरूबसव ग्राम विकास परिवर्तन पँनेलला पांठिबा दिला. त्यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना भाउराया बिराजदार म्हणाले संखच्या विकास करण्यासाठी परिवर्तन गरजेचे आहे. जनतेशी निगडीत अनेक प्रश्न सोडविण्यात सत्ताधारी कमी पडले आहेत.त्यामुळे पिण्याच्या पाण्यासारखे प्रश्न कायम आहेत. ते सोडवायचे तर विकास कामाला महत्व देणाऱ्या आर. के. पाटील यांच्या व विकास या मतावर आम्ही गुरूबसव ग्राम विकास परिवर्तन पँनेलला बिनशर्त  पांठिबा दिला आहे. पुर्ण ताकत लावून पँनेलचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू असेही बिराजदार म्हणाले. शिवाय आमचे सर्व उमेदवारांनी माघारी घेत गुरूबसव ग्राम विकास परिवर्तन पँनेलला पांठिबा दिला आहे. यावेळी माजी सभापती आर.के.पाटील,आर.बी.पाटील, आय.एम.बिरादार,राजेद्र हलकुडे,शरणप्पा शिळीन,राजेद्र  कनुरे,सौ.मंगल रा.पाटील,जि.प.सदस्या सौ. रेखा बागेळी आदि मान्यवर व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. 

शेतकरी संघटनेचे सर्व उमेदवारांनी माघार घेत गुरूबसव ग्राम विकास परिवर्तन पँनेलला बिनशर्त पांठिबा दिला.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.