संख ग्रामपंचायत निवडणूक : गुरूबसव ग्राम विकास परिवर्तन पँनलच्या प्रचाराचा नारळ फुटला

0
Rate Card

संख ग्रामपंचायत निवडणूक : गुरूबसव ग्राम विकास परिवर्तन पँनलच्या प्रचाराचा नारळ फुटला

संख, वार्ताहर :संख येथे ग्रामपंचायत निवडणूकीसाठी भाजपच्या श्री. गुरूबसव ग्राम विकास परिवर्तन पँनलच्या प्रचाराचा शुंभारभ रविवारी विविध मान्यवर, पदाधिकारी व मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकाच्या समवेत करण्यात आला. भाजप नेते माजी सभापती आर. के. पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रणित पँनेलकडून निवडणूक लढविली जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक,व संख सोसायटी निवडणूकीत विजयी सलामी दिलेल्या भाजप समर्थकांचा विश्वास दुणावला आहे. त्यामुळे यावेळी पंचवीस वर्षापासून सत्तेत असलेल्या विरोधी गटाला पराभूत करण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न सुरू झाले आहेत. केंद्र, राज्य,जिल्हा,तालुक्यात भाजपची सत्ता आहे. गावाचा विकास साधायचा तर भाजपचे पँनेल बहुमतानी विजयी करावे असे आवाहन आर. के. पाटील यांनी केले. ते म्हणाले गेल्या पंचवीस वर्षापासूनचा संख गावचा विकासाचा अनुशेष भरून काढायचा आहे. भविष्यात तालुका होणाऱ्या संख गावात  विकास साधण्यासाठी भाजपचीच सत्ता असणे गरजेचे आहे.जत नंतर सर्वात मोठे असणाऱ्या संखला विकास प्रवाहात आणण्यासाठी आम्ही सर्वच उमेदवार उच्चशिक्षित,अनभुवी,अभ्यासू मैदानात उतरवले आहेत.सर्वत्र आम्हाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने त्यामुळे विजय आमचाचं असेल असेही पाटील शेवटी म्हणाले.

Displaying IMG-20171007-WA0043.jpg

संख : येथील गुरूबसव ग्राम विकास परिवर्तन पँनलच्या प्रचाराचा शुभारंभ श्रीफळ वाढवून करताना मान्यवर  

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.