दिवाळीत शेकडो किलो खव्याची आयात
मिठाईच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह : ‘एफडीए’ला भेसळच दिसेना ! म्हणे, सर्वत्र आलबेल:मिठाई बनविणारे स्वत: कधीच खात नाहीत
जत,का.प्रतिनिधी: दिवाळीच्या काळात जत शहरासह तालुक्यातील मिठाईसाठी लागणारा शेकडो किलो खवा जत तालूक्यात उपलब्धं होत नसल़्याने उत्तर महाराष्ट्रासह,मध्यप्रदेश, गुजरात,आयात केला जातो. परंतु या खव्याची पर्यायाने त्यापासून बनणार्या मिठाईची गुणवत्ता काय याबाबत प्रश्नचिन्ह लावले जात आहे.रस्त्या कडेला पडलेले खव्याचे गठ्ठे अन्न भेसळ विभागाच्या तिक्ष्न नजरेतून सुटते हा संशोधनाचा मुद्या आहे. कारण या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणार्या अन्न व औषधी प्रशासन विभागाला आजपर्यंत भेसळ आढळून आलेली नाही. त्यामुळे या विभागाच्या ‘कामगिरी’कडे संशयाने पाहिले जात आहे. पूर्वी ग्रामीण भागात व शहरालगतच्या गावखेड्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात जनावरे होती. त्यानंतरही दूध कमी पडत होते. आज लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. शहरांचाच नव्हे तर गावांचाही विस्तार झाला आहे. त्या तुलनेत चारा-पाणीटंचाईमुळे जनावरांची संख्या मोठय़ा प्रमाणात घटली आहे. दुधाच्या मागणीत वाढ आणि पुरवठय़ात प्रचंड घट झाल्याने तफावत निर्माण झाली आहे. त्यानंतरही दूध येते कोठून हा प्रश्न कायम आहे. येणारे दूध हे भेसळ करून आणले जात असावे, अशी दाट शक्यता आहे. चहाला व लहान मुलांना पिण्यासाठी दूध कमी पडत असताना मिठाईसाठी खवा बनवायला एवढे दूध येते कोठून हा अन्न व औषधी प्रशासनासाठी संशोधनाचा विषय ठरला आहे.
खवा पाच ते सहा दिवस टिकतो. परंतु तो अधिक काळ टिकावा, आंबूसपणा येऊ नये म्हणून त्यात साखर टाकली जाते. दूध पावडरपासून खवा बनविला जातो. त्यावर मलाई येत नसल्याने तो अधिक काळ टिकतो. खवा दीर्घकाळ टिकविण्यासाठी आरोग्याला घातक असलेल्या आरारोड पावडरचासुद्धा त्यात वापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती आहे.
दसरा ते दिवाळी या काळात दुधाची प्रचंड मागणी राहत असल्याने मिठाई कारखान्यांना बाहेरच्या खव्यावर अवलंबून रहावे लागते. बहुतांश मिठाईवाले ‘आमचे स्वत:चे दूध संकलन केंद्र आहे’ असे सांगतात. परंतु प्रत्यक्षात अशा दूध संकलकांची संख्या अगदीच बोटावर मोजण्याऐवढी आहे. गाई-म्हशीच्या एकूणच दुधाचे गणित पाहता बाहेरुन येणारा हा खवासुद्धा किती शुद्ध असेल याची शंका येते. पर्यायाने अनेक दुकानांमधून मिळणार्या मिठाईच्या गुणवत्तेभोवती संशयाचे वलय निर्माण झाले आहे. अनेक दुकानांमध्ये ही मिठाई बनविण्यासाठी पर राज्यातून कारागीर बोलविले जातात. जत तालूक्यात कुठेही खव्वा करण्याची मोठी सोय नाही.काही बोटावर मोजण्या एवड्या घरगूती खवा तयार करणारे कारागिर आहे.बाकी मिठाई दुकानासाठी कुठून खवा येता हा प्रश्न आहे अनेक दुकानदार चांगल्या खव्यापासून मिठाई बनवितो’ असे सांगून शुद्धतेचा देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्यक्षात ‘वास्तव’ मात्र वेगळेच आहे.
खवा व पर्यायाने मिठाईमध्ये होणार्या भेसळीला अन्न व औषधी प्रशासनाचाही हातभार लागत असल्याचे त्यांच्या ‘कामगिरी’वरून दिसून येते.
जत तालूक्यात अनेक परवाना धारक व त्याच्या पेक्षा जादा बिगर परवाना धारक मिठाई दुकाने आहेत.हे दुकानदार इतरांना कार्यप्रसंगासाठी मिठाई नेण्याचा आग्रह करणारे या मिठाई निर्माते व विक्रेत्यांचे कुटुंबीय मात्र स्वत: कधीच ही मिठाई खात नसल्याचे एका विक्रेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. कोणत्याही आनंदाच्या क्षणी ही मंडळी स्वत: कधीच मिठाई वाटत नाही. त्याऐवजी शेंगदाने व साखर हा पर्याय ते निवडतात. मिठाई बनविणार्यांना स्वत:च ही मिठाई खाण्याची हिंमत होत नाही. कारण या मिठाईमागील ‘वास्तव’ बनविणार्यांना चांगले ठाऊक असते. यावरून या मिठाईची व त्याच्या खव्याची खरोखरच काय गुणवत्ता राहत असेल, हे स्पष्ट होते. जत तालूक्यात खव्याची पर्यायाने त्यापासून बनणार्या मिठाईची गुणवत्ता काय याबाबत प्रश्नचिन्ह लावले जात आहे. कारण या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणार्या अन्न व औषधी प्रशासन विभागाला आजपर्यंत भेसळ आढळून आलेली नाही. त्यामुळे या विभागाच्या ‘कामगिरी’कडे संशयाने पाहिले जात आहे.