आज पक्षनेत्यांना टशन

0
Post Views : 0 views

 आज पक्षनेत्यांना टशन 

  

ग्रामपंचायती निवडणूकी अर्ज माघारीचा

Rate Card

दिवस : सगळेच टाईट

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील 81 ग्रामपंचायतीचा रणसंग्राम आजपासून निर्णायक होत आहे. निवडणूकीसाठी अर्ज मागे घेण्याचा दिवस आज आहे. तुलाच उमेदवारी देतो म्हणून भरलेले अनेक अर्ज तुल्यबंळ उमेदवार वगळता बाकीचे अर्ज मागे घेण्यासाठी पक्ष नेत्यांना टशन आले आहे.बुधवारी रात्री उशिरापर्यत सर्वच गावात उमेदवारी वरून खल सुरू होता. अर्ज भरलेले अनेक इच्छूक उमेदवारी वर ठाम होते. तर काही ठिकाणचे डमीही ऐनवेळी उमेदवारी साठी आडून बसले आहेत. शिवाय ऐनवेळी पँनेल मध्ये आलेल्या उमेदवारी देतांना अगोदरचे उमेदवाराचा नाराजी पँनेल प्रमुखांना ओडवून घ्यावी लागत आहे. आज दिवसभरात नको असलेल्या उमेदवारांचे अर्ज मागे घेताना इच्छूंकाची मनधरणीबरोबर मोठ्या कसरती होणार आहे. अर्ज भरलेले अनेक उमेदवार उमेदवारी साठी टाईट आहेत. कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने नाराजाचे तिसरे पँनेलही उदयास येऊ शकते. मात्र आजच्या घडामोडीवर सर्व चित्र अंवलबून आहे. संख,उमदी,माडग्याळ, जाड्डरबोबलाद,डफळापूर, कुंभारी,मुंचडीत अर्ज माघारीसाठी अनेकाच्या उड्या बघायला मिळणार आहेत. दुसरीकडे पँनेल मधून उमेदवारी नाकारलेले अनेक उमेदवार समोरच्या पँनेलमधून उमेदवारी मिळावी म्हणूनही प्रयत्न करताना दिसत होते. एंकदरीत आज नंतर लढती निश्चित होणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.