05/10/17 गुरुवारचा परीपाठ

0

*05/10/17 गुरुवारचा परीपाठ*

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤

*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅

 ━━═•●◆●★❂★●◆●•═━━

*Ⓜ💲
🅿 _परीपाठ_ Ⓜ💲
🅿*

====●●●★♦★●●●====

*❂ दिनांक:~ 05/10/2017 ❂*

       *🔘 वार ~ गुरुवार 🔘*

*⛶⛶⛶⛶⛶⛶⛶⛶⛶⛶⛶⛶⛶⛶*

  *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*

➖➖➖➖➖➖➖➖

    *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*

➖➖➖➖➖➖➖➖

  *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*

*✽≡❃≡≡❂≡✧❃❃✧≡❂≡≡❃≡✽*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*

*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*

       🔘 *”माझी शाळा”* 🔘

   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*

    🔗
🔗
👇
👇
🔗
🔗

   https://goo.gl/ZtWbqB

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

*0१ ]   ❂ आजचे पंचाग ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

 🍥 *05.ऑक्टोबर :: गुरुवार* 🍥

      ─┅━━═▣✧▣═━━┅─

              आश्विन पूर्णिमा 

      नक्षत्र : उत्तरा भाद्रपदा,

       योग : व्रुद्धी, करण : विष्टी,

सूर्योदय :06:30, सूर्यास्त :18:24,

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0२ ]    ❂ सुविचार ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

05. *कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

05. *खायला काळ भुईला भार –* 

  ★ अर्थ ::~ ज्याचा काही उपयोग नाही असा माणूस भार बनतो.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

05. *बुद्धिः कर्मानुसारिणी ।*

            ⭐अर्थ ::~

 बुद्धी ही कर्माचे अनुसरण करणारी असते. (आपण जसे कर्म करतो त्याप्रमाणे आपली बुद्धी बनते.)

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

  🛡 ★ 05. ऑक्टोबर ★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻

★ हा या वर्षातील २७८ वा (लीप वर्षातील २७९ वा) दिवस आहे.

        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~

 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹

●१९८९:मीरासाहेब फातिमा बिबी या सर्वोच्‍च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या.

●१९५५:पंडित नेहरुंच्या हस्ते ’हिन्दूस्तान मशिन टूल्स’ या कारखान्याचे उद्‍घाटन झाले. भारताच्या औद्योगिक विकासात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.

●१८६४:एका भीषण चक्री वादळामुळे कोलकात्यात सुमारे ६०,००० जण ठार

      ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~

 🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸

◆१९२२:शंकरसिंग रघुवंशी – शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार 

◆१९२२:यदुनाथ दत्तात्रय थत्ते – पत्रकार, समाजसेवक, लेखक, चरित्रकार’ ’साधना’ मासिकाचे संपादक 

◆१८९०:किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला – तत्त्वज्ञ. गांधीजींच्या हत्येनंतर साडेचार वर्षे ते ’हरिजन’चे संपादक होते. 

        ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~

 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹

●१९९७:चित्त बसू – संसदपटू, ’फॉरवर्ड ब्लॉक’चे सरचिटणीस 

●१९९२:बॅ. परशुराम भवानराव तथा अप्पासाहेब पंत – नामवंत मुत्सद्दी, पद्मश्री (१९५५), इजिप्त, नॉर्वे, ब्रिटन इ. देशांतील भारताचे राजदूत

●१९९१: *रामनाथ गोएंका –* ’इन्डियन एक्सप्रेस’ वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक, स्वातंत्र्य चळवळीतील नेते 

●१९८१: भगवतीचरण वर्मा – हिन्दी कथाकार, कादंबरीकार, कवी, एकांकिकाकार, पटकथाकार व नाटककार, पद्मभूषण 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🚦सतिष बोरखडे दारव्हा*

   💥
📱7875840444💥

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••

*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

05. *✸ गे मायभू तुझे मी फेडीन ✸*

         ●●●●●००००००●●●●●

Rate Card

गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे;

आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे.

आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा;

शब्दांत सोड माझ्या आता हळूच पान्हा.

आई, तुझ्यापुढे ही माझी व्यथा कशाला ?

जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मांस अर्थ आला !

मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी,

माझी ललाटरेषा बनते प्रयाग… काशी !

आई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी;

माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी !

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0७ ]      ❂ प्रार्थणा ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

05. *❂ !!! आजचा अभंग !!! ❂*

     ━━═●✶✹★●★✹✶●═━━

अमृताचीं फळें अमृताची वेली ।

ते चि पुढें चाली बीजाची ही ॥१॥

ऐसियांचा संग देइ नारायणा ।

बोलावा वचना जयांचिया ॥२॥

उत्तम सेवन सितळ कंठासी ।

पुष्टी कांती तैसी दिसे वरी ॥३॥

तुका म्हणे तैसें होइजेत संगें ।

वास लागे अंगें चंदनाच्या ॥४॥

                    ~ संत तुकाराम

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0८ ]    ❂ बोधकथा ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

05. *❃❝ कष्टाचे सार्थक होणे ❞❃*

     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━

         ” एकदा एक व्यापारी त्याच्या काही नोकरांबरोबर दुसऱ्या देशात व्यापार करण्यासाठी जात असतो जाताना त्यांना रस्त्यात वाळवंट लागते. वाळवंटात चालून चालून त्याच्या काही नोकरांना पाण्याविना चक्कर यायला लागते. उन्हामुळे आणि जवळ कोठेही पाणी नसल्यामुळे नोकर कासावीस होऊ लागतात . 

   त्यांची अवस्था पाहून व्यापारी मनात विचार करतो जर मीच माघार घेतली तर माझे नोकर पण माघार घेतील. मला माघार घेऊन चालणार नाही.मला आशावादी राहायला हवे. व्यापारी इकडे तिकडे पाहू लागतो त्याला जवळच एक हिरवे झुडूप दिसते. 

व्यापारी विचार करतो कि जर पाणी नाही तर हिरवे झुडूप कसे आले? म्हणजे नक्कीच येथे पाणी असावे . व्यापाऱ्याला हायसे वाटते. 

  व्यापाऱ्याने नोकरांना तेथे खोदायला सांगितले त्याचे नोकर खोदतात पण खाली दगडच दिसतात. पाणी लागताच नाही व्यापारी म्हणतो आणखी थोल खोद व्यापारी दगडांना आपले कान लावतो त्याला जमिनी खालील पाण्याच्या प्रवाहाचा आवाज ऐकू येतो. व्यापारी त्या दगडांवर एक हातोडा मारतो. आणि काय आश्चर्य जमिनीतून पाण्याचे कारंजे उडू लागते. ते पाणी पिउन सर्वाना खूप आनंद होतो. त्यांच्या कष्टाचे सार्थक होते. 

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 

  *”प्रयत्न केला तर यश मिळते. “*   

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

05.  *जिवनात खरं बोलून “मन”*

    *दुखावलं तरी चालेल…*

*पण खोट बोलून “आनंद” देण्याचा कोणाला कधीच प्रयत्न करू नका…*

   कारण….   त्यांच आयुष्य असतं 

  *फक्त तुमच्या “विश्वासांवर…!!*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

05. *✿ सामान्य माहिती ✿*

    ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑ 

१}- सायकलचा शोध कोणी लावला ?

    ➜      *मँक मिलन*

२}- श्री.गजानन महाराज मंदिर कोठे आहे ? 

    ➜  *शेगांव*

३}- कोणत्या धातुंना एकञ करुण चुंबक तयार केले जाते ? 

   ➜ *निकेल+अँल्युमिनीयम*

४}- महासागरातिल सर्वात खोल गर्ता कोणती आहे ? 

    ➜  *मरियाना* पँसिफिक महासागर

५}- भारतातिल केशर उत्पादनातिल प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे ? 

    ➜  *जम्मु काश्मिर*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

05. *❒ ♦रामनाथ गोएंका♦ ❒*  

     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━

●जन्म :~ २२ एप्रिल १९०४,

दरभंगा, बिहार, भारत-

●मृत्यू :~ ५ ऑक्टोबर १९९१

    हे इंडियन एक्‍स्प्रेस वृत्तपत्रसमूहाचे संस्थापक अध्यक्ष आणि स्वातंत्र्य चळवळीतील ज्येष्ठ नेते होते.

   १९४२ मध्ये भारत छोड़ो आंदोलन दरम्यान  भारतीय राष्ट्रीय कांग्रेस मध्ये यांची भूमिका महत्त्वाची आहे. 

     इन्दिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणी चा यांनी टोकाचा विरोध केला. 2000 ला इंडिया टुडे पत्रिका ने यांना भारत देश बनवण्यासाठी योगदान देणाऱ्या 100 लोकांच्या यादीत ठेवले आहे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••

           *✍संकलन ✍*

*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*

   ♦📱 7875840444 ♦

 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*

█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.