तालुक्यातील विविध प्रश्नासाठी सरकारकडे पाठपुरावा ; आ.विक्रमसिंह सांवत यांची माहिती | तालुका विभाजन,सिंचन योजनेला प्राधान्य

0



जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात अनेक दिवसापासून रखडलेले तालुका विभाजन,सिंचन योजनासाठी मी प्राधान्याने सोडविण्यासाठी कठिबंध्द असून शासनाच्या सर्व योजना सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. येत्या अधिवेशनात त्यावर चर्चा करावी,अशी मागणीही मी केली आहे, अशी माहिती आ.विक्रमसिंह सांवत यांनी पत्रकार परिषदेत दिली.






तालुक्यातील विविध प्रश्नासाठी आ.सांवत यांनी मुख्यमंत्री व विविध खात्याच्या मंञ्याची भेट घेत‌ निवेदने दिले आहेत. त्याची माहिती आ.सांवत यांनी पत्रकारांना दिली.

यावेळी जत नगरपरिषदेचे नगरसेवक भूपेंद्र कांबळे, विक्रम फांऊडेशनचे अध्यक्ष अँड.युवराज निकम,माजी नगरसेवक महादेव कोळी उपस्थित होते.






आ.सांवत पुढे म्हणाले, जत तालुक्यात दीड वर्षात आघाडी सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे.

सध्या तालुक्याला भेडसावणारे तालुका विभाजनासाठी मुख्यमंत्री ठाकरे,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन वस्तूस्थिती मांडली आहे,तालुक्याचा मोठा विस्तारामुळे शासकीय कामासाठी नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे विभाजनाचा विषय मांडला आहे.





तालुक्यातील म्हैसाळ योजनेतून फक्त 22 हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आहे.उर्वरित भागासाठी कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर, विस्तारित म्हैसाळ योजना किंवा अन्य कोणत्याही मार्गाने आम्हाला शेतीला पाणी द्यावे,यासाठी पाठपुरावा केला आहे. जिल्ह्याचे पासकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना याबाबतची माहिती सादर केली आहे. म्हैसाळ योजनेतून पुर्ण क्षमतेने पाणी सोडावे,व अन्य भागात पाणी यावे यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

Rate Card






जत न्यायालयाची सध्याची इमारत अपुरी ठरत आहे. त्यामुळे न्यायालयाची प्रशस्त इमारत बांधावी,यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन त्याबाबत वस्तूस्थिती मांडली असून तसे निवेदन दिले आहे.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या भटक्या विभक्त जातीतील धनगर समाजाच्या विविध 22 योजनातून विकासासाठी निधी मिळावा यासाठी संबधित विभागाकडे मागणी केली आहे.





तालुक्याचे अंतर मोठे असल्याने विविध आजार,अपघातातील रुग्णांना तात्काळ उपचार मिळावा म्हणून जत शहर येथे ट्रामा केअर सेंटर सुरू करण्याची मागणी आरोग्य विभागाकडे केली आहे.

जत व उमदी पोलीस ठाण्याच्या पोलीस वसाहत,अधिकारी निवास स्थानासाठी पाठपुरावा केला असून 78 पोलीस कर्मचारी व 3 अधिकाऱ्यांसाठी निवास स्थानासाठी मागणी केली आहे.

त्याशिवाय अग्रो बिजनेस अतर्गंत 100 टक्के अवर्षण ग्रस्त असणाऱ्या आपल्या तालुक्यासाठी विशेष निधी देण्याची मागणी केली आहे.यासह तालुक्यातील विकासाचा बकलॉग भरून काढण्यासाठी माझा सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. येत्या अधिवेशनात तालुक्यातील शाळाच्या इमारती,कन्नड गावात मराठी शाळा,शिक्षकांचा रिक्त जागासह काही मागण्या मांडण्याची मागणी आम्ही केली आहे,असेही आ.सांवत म्हणाले.



Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.