जतची कुलस्वामीनी श्री. अंबामाता
जतची कुलस्वामीनी श्री. अंबामाता
जत शहरातील श्री. अंबाबाई मंदिर संस्थान काळापासून प्रसिध्द आहे.जत करांची कुलस्वामिनी म्हणून सर्वत्र प्रसिध्द आहे. ऐतिहासिक असणाऱ्या जतच्या अंबामाता नवसाला पावणारी देवी म्हणून परिचित आहे. नवरात्र उत्सावानिमित्त येथे मोठ्या प्रमाणात महिलासह भाविकांची गर्दी असते. जत पासून बिंळूरला जाणाऱ्या डोंगर खुशीत अंबाबाई प्रगटली आहे. तिचा महिमा दिवसेंनदिवस वाढत गेल्याने डोंगर खुशीत मोठे मंदिर निर्माण करण्यात आले आहे. मंदिरापर्यत पायऱ्यांची वाट,सभामंडम,मंदिराचे प्रशस्त बांधकाम वैभवात भर घालते आहे.जत- बिंळूर रोड लगत देवीच्या मंदिराकडे जाणारी स्वागत कमान दृष्टीस पडते तेथून पुढे डोंगरापर्यत डांबरीकरण करण्यात आले आहे.तेथून डोंगरावरील मंदिरापर्यत पायऱ्यां बांधल्या आहेत. जत मधील प्रतिष्ठित नागरिक श्री. जोग साहेब,सुभाष कुलकर्णी, मनोहर गायकवाड, रेवणसिध्द शिवनगी,सदामामा,गुरूमामा यांनी पन्नास वर्षापुर्वी डोंगरातील मुजलेल़्या मंदिराच्या मुर्तीची साफसफाई करून डोंगरावर जाण्यासाठी पायऱ्यां करून मंदिराच्या कार्यास सुरूवात केली.कालांतराने मंदिराचा 1974 साली जिर्णोद्वार करण्यात आला.आता तेथे भव्य असे मंदिर,नविन मुर्तीस्थापना,सभामंडप,दगडी पायऱ्या करण्यात आल्या आहेत. यासाठी लोकवर्गणी,शासकीय वनीकरण विभागाचे सहकार्य लाभले. जत नगरपालिकेच्या वतीने दिवा भत्तीची सोय करण्यात येते.नवरात्र उत्सावानिमित्त मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रम राबविले जातात.देवीची यात्रा कोजागीरी पौर्णिमेस भरते.देवीच्या त्रस्टच्या वतीने योग़्य नियोजन करण्यात येते.

संकलन ; पुंडलिक बाळू पांढरे,जत