जत तहसील कार्यालयात 8 कर्मचाऱ्याकडे आजपासून नव्या टेबलचा पदभार !
जत,संकेत टाइम्स : जत तहसील कार्यालयातील अखेर टेबल कर्मचाऱ्यांची खांदेपालट करण्यात आली आहे.तसे आदेश 13 संप्टेबर 2021 रोजी काढण्यात आले आहेत.जतला नव्या आलेले तहसीलदार जीवन बनसोडे आज पदभार स्विकारणार आहेत.त्याचबरोबर अनेक दिवसापासून एकाच टेबलवर तळ ठोकलेले कर्मचारी हलविल्याने चांगल्या कारभारची अपेक्षा व्यक्त होत आहे.
जत तहसील कार्यालय म्हणजे लुट्टीचा अड्डा बनले आहे.दलालाचा विळखा वरकमाईला सोकावलेले कर्मचारी यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना साहेबांची दक्षिणा दिल्याशिवाय पुढे जाता येत नाही.त्याशिवाय दलालाकडून या टेबल कर्मचाऱ्यांना हाताशी धरून सामान्य नागरिकांना नागविण्याचे प्रकार बेधडक सुरू आहेत.अनेक दिवसापासून टेबलला चिटकून असलेल्या कर्मचाऱ्यांची झालेली प्रगती डोळे दिपविणारी आहे.साधा कोतवालही चारचाकी गाडी घेऊन फिरतानाचे चित्र वास्तव आहे. अनेक कर्मचाऱ्यांना किंमती चारचाकी वाहनाचे हप्ते भरण्यासाठी मिळकतीचा टेबल हवा असल्याची चर्चा असून ते थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर अशा पध्दतीने वाच्चता करतात,यापेक्षा या कार्यालयाची दयनीय अवस्था शंब्दात व्यक्त करण्यापलिकडची आहे.
दरम्यान येथील टेबलला चिटकून असलेले काही कर्मचारी आता हलविण्यात आले असून तसे आदेश काढण्यात आल्याचे पत्र संकेत टाइम्सच्या हाती लागले आहे.
नव्याने दिलेले कर्मचारी व टेबल ; सदाशिव बिराजदार,(लिपिक)- आवक-जावक संकलन,एस.एस.ठाकूर,(लिपिक)-आस्थापना संकलन,अशोक साळुंखे(लिपिक)-अभिलेख संकलन,सोनाली पाटील(लिपिक)-जमिन संकलन,वनिता वाघमोडे(लिपिक)-संगायो संकलन,जेलर सुलाने (लिपिक)-हक्कनोंद संकलन,अभिजीत गायकवाड(लिपिक)-पुरवठा संकलन,निलांगी झिंजे(लिपिक)-जमावबंदी संकलन अशी नियुक्ती करण्यात आली आहेत.
आजपासून नव्या टेबलवरून या कर्मचाऱ्यांकडून काम होणे अपेक्षित आहे.

अजूनही तळ ठोकलेले कर्मचारी
तहसील कार्यालयात अजूनही अनेक कर्मचारी अनेक वर्षापासून मालदार टेबलवर तळ ठोकून आहेत.त्यांची खांदेपालट करण्याची जबाबदारी आता नवे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्यावर आहे.
लाचलुपतमध्ये सापडलेले कर्मचारी पुन्हा
जत तहसील कार्यालयात काही नव्याने नेमणूक झालेले कर्मचारी जतमध्ये यापुर्वी लाचलुपत विभागाने कारवाईत पकडले असतानाही त्या कर्मचाऱ्यांची जतेत पुन्हा नेमणूक झाली आहे.त्यामुळे या नेमणूकीमागचे अर्थकारण चर्चेचा विषय आहे.