जत,संकेत टाइम्स : जत शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्र व एलआयसी ऑफिस समोरून बँकेतून काढलेले पावने चार लाख रूपयाची रोखड दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी गजबजलेल्या चौकातून पळवून नेहल्याची घटना सोमवारी पावने तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.दोघे चोरटे सीसीटिव्हीत कैद झाले असून त्यांना पकडण्याचे आवाहन जत पोलीसासमोर आहे.यामुळे जत शहर असुरक्षित झाले आहे.
अधिक माहिती अशी,सिध्दनाथ (ता.जत) येथील शेतकरी संभाजी लकाप्पा चौगुले (वय ४२)यांचे त्यांच्या द्राक्ष,डांळिब विक्रीचे पैसे जत शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र येथील खात्यावर जमा झाले होते.ते काढण्यासाठी चौगुले सोमवारी जतेत आले होते.दुपारी पावनेतीन वाजण्याच्या सुमारास ते बँकेतून तीन लाख सत्तर हजार रूपये प्लास्टिक पिशवीमध्ये घेऊन उमराणी रोड येथे लावलेल्या फोर्ड कंपनीची चारचाकी एमएच १०,बीएम ९९१२ या गाडीत पाठीमागील सीटवर ठेवले.तेवढ्यात त्यांच्या गाडीच्या चाकातील हवा गेल्याचे त्यांच्या लक्षात येताच ते बघत असतानाच दुसऱ्या बाजूने ३० ते ३५ वयोगटातील पांढरा शर्ट घातलेल्या एका अज्ञात चोरट्यांने दरवाज्या उघडून पैशाची बँक घेऊन पळ काढला.चौगुले व त्यांच्या मित्राने त्यांचा पाठलाग केला मात्र बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील काही अंतरावर अन्य एक चोरट्याच्या दुचाकीवरून ते भरधाव वेगाने निघून गेले.चौगुले यांनी तात्काळ जत पोलीसांना घटनेची माहिती दिली.
पोलीसांनी शोधाशोध केली मात्र रात्री उशिरापर्यत चोरट्याचा थागपत्ता लागला नव्हता.पोलीसांचे एक पथक सीसीटिव्हीतील छायाचित्रणातील व्यक्तीची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत होते.दुसरीकडे सीसीटिव्हीत लांबून चित्रण झाल्याने दुचाकीचा नंबर अस्पष्ट दिसत असल्याने पोलीसासमोर मोठे आवाहन उभे आहे.अधिक तपास उपनिरिक्षक भारती करत आहेत.
दरम्यान जत पोलीसांचा धाक संपल्याचे चित्र शहरात असून अधिकाऱ्यांचे मवाळ धोरण अशा चोरट्यासह अवैध धंदे, सावकारांसह गुन्हेगारांना बळ देत असून मुख्य अधिकाऱ्यांने अंग झटकून काम करण्याची गरज निर्माण झाली आहे.
बोटावर मोजण्याएवढ्या चोऱ्यांचे तपास
जत शहरासह तालुक्यात शेकडो चोऱ्या झाल्या आहेत.दुकान,घरफोडी,बँकेतून पैसे चोरीला जाण्याचे अनेक घटना घडल्या आहेत. दुचाकी तर शंभरावर चोरीला गेल्या आहेत.यातील काही बोटावर मोजण्याएवढ्या घटनाचे तपास लागले आहेत.सुमारे ९०टक्के घटनाचे तपास अद्याप तपास सुरू आहेत,यापुढे गेलेले नाहीत.किंवा पोलीसांनी ते पुढे नेहलेले नाहीत.पोलीसाचे हे सोयीस्कर धोरण नव्या गुन्हेगार वाढीला पोषक ठरले असून दररोज तालुक्यात कुठेतरी अशा एक-दोन घटना घडत आहेत. त्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे.