आंवढीत आजी-माजी सैनिकांचा सत्कार

0
आंवढी,संकेत टाइम्स : आवंढी गावचे सुपुत्र रावसाहेब लक्ष्मण मरगळे हे भारतीय सैन्यदलातुन सुभेदार मेजर पदावरून सेवानिवृत्त झालेबद्दल व आजूबाजूच्या आजी-माजी सैनिकांचा आंवढी ग्रामस्थाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांना अविरत आरोग्य सेवा पुरविणार्या डॉक्टर्स, सिस्टर, सीएचओ, आंगणवाडी सेविका,आरोग्यसेविका, आशा वर्कर्स,ग्रामपंचायत कर्मचारी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. श्री संत बाळुमामा देवस्थान येथे हा सोहळा पार पडला.यावेळी सुभेदार मेजर रावसाहेब मरगळे यांचा सपत्नीक व आई, वडील,भाऊ असा कौंटुंबिक सत्कार करण्यात आला.लोहगावचे मेजर प्रतापराव पाटील,वाळेखिंडीचे मेजर शिंदे,तसेच अंतराळ,बनाळी,शेगाव व परिसरातून आलेल्या आजी-माजी सैनिकांचाही सन्मान यावेळी करण्यात आला.
कोरोना काळात महत्वपुर्ण योगदान दिल्याबद्दल, शेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.नदाफ,त्याचे सहकारी डॉ.सागर व मुजावर, तसेच जत ग्रामीण रुग्णालयाचे एनार एचमचे डॉ.शिवाजी खिलारे,डॉ.आण्णासाहेब कोडग, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आवंढीचे डॉ. बंडगर,डॉ.सौ.बंडगर,ओम साई लँब शेगावचे समाधान माने,इंद्रायणी मेडिकलचे सागर बागल,सिस्टर शशिकला बाबर,पार्वती काळे,आशा वर्कर सौ.भारती कोडग,अर्चना हेगडे,गौतमी तोरणे,अंगणवाडी सेविका,सौ.अनुराधा कोडग,मंगल एडगे,जनाबाई कोडग,ग्रा.पं चे ग्रामरोजगार सेवक हिम्मत कोडग ,पाणीपुरवठा कर्मचारी संजय कोडग, संकेत टाइम्स प्रतिनिधी हणमंतराव बाबर यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
Rate Card
याप्रसंगी पंचायत समिती माजी सभापती बाबासाहेब कोडग,जत तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष दत्ता शिंदे, उपाध्यक्ष बबनरा कोळी, सोसायटीचे चेअरमन माणीक पाटील,लोहगाव सोसायटीचे माजी चेअरमन समाधान काशीद,सचिन पाटील,ग्रा.पं.सदस्य संजय एडगे,माजी उपसरपंच अनिल कोळी, माजी ग्रा.पं.सदस्य महादेव मरगळे,रामचंद्र कोडग,सतिश कोडग, सुरेश कोडग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत पै.अरुण कोडग,प्रास्ताविक व सुत्रसंचालन माजी उपसरपंच प्रदिपद कोडग यांनी तर चंद्रकांत कोडग सर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन व भोजन व्यस्थेचे नियोजन आजी – माजी सैनिक संघटना, राजे शिवराय ग्रुप, नवतरुण गणेशोत्सव मंडळ एम.आर.वस्ती व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.