टेबल पुराण ; टेबल बदलाला तहसीलदारांचा खो कशासाठी ? | अर्धा अंमल,लुटेरे कर्मचारी अद्याप तळ ठोकूनच

0
जत,संकेत टाइम्स : जत तहसील कार्यालयातील लुटेरे कर्मचाऱ्यांचे टेबल बदलून तब्बल दहा दिवसाचा काळ लोटला तरीही काही कर्मचाऱ्यांनी टेबल सोडलेले नाहीत.विशेष म्हणजे नायब तहसीलदार पि.डी.माळी यांच्या संकलन नेमणूक आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करा,असे सक्त आदेश तत्कालीन प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांनी दिले होते.मात्र तब्बल सव्वा महिन्यानंतर नव्याने आलेले तहसीलदार जीवन बनसोडे यांनी या टेबल बदलाला खो घातला असून काही कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मुळ टेबलचा पदभार सोडूनही त्यांच्याकडे बदलेले टेबल दिलेले नाही.तर अनेक दिवसापासून मलईदार टेबलवर तळ ठोकलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचा टेबल वाचविण्यासाठी थेट नव्या तहसीलदाराची मनधरणी केल्याची चर्चा सुरू आहे.
तहसील कार्यालयात मंडल अधिकाऱ्यांचे अव्वल कारकून म्हणून नव्याने रुजू झालेल्या एका कर्मचाऱ्यांना त्याबाबत नव्या तहसीलदारांना चुकीची माहिती देऊन कर्मचाऱ्यांची टेबल बदल थांबविल्याचीही चर्चा सुरू आहे. तहसील कार्यालयातील टेबल पुराणची तालुकाभर मात्र जोरदार चर्चा सुरू आहे.दलालाने बरबटलेल्या तहसील कार्यालयात यापुढे बदल होणार नसल्याचे स्पष्ट झाले असून नवे तहसीलदार यांना कर्मचाऱ्यांच्या एकाधिकारशाहीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कसरत करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Rate Card
टेबलचा विषय मी बघतो
टेबल पुराण बाबत नवे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,माझ्या कार्यालयातील विषय मी बघतो,असे म्हणून विषयाला बगल दिली.त्यामुळे नागरिकांना बेधडक लुट करत नागविणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कशासाठी मुदत वाढ असा सवाल यामुळे उपस्थित झाला आहे.
नायब तहसीलदारांचे‌ आदेशाला केराची टोपली
जत तहसील कार्यालयातील टेबल बाबत सातत्याने तक्रारी आलल्याने रिक्त तहसीलदार पदाचा पदभार असलेले नायब तहसीलदार पी.डी.माळी यांनी ८ कर्मचाऱ्यांचे टेबल बदलण्याचे आदेश काढले होते.या आदेशाला काही कर्मचाऱ्यांनी केराची टोपली दाखविली आहे.तर एका कर्मचाऱ्यांने नव्या तहसीलदारासमोर डोळ्यात पाणी आणल्याने तहसीलदारांनी त्यांच्या टेबलला तात्पुर्ती स्थगिती दिल्याचे कळते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.