वाळू तस्करांना वरदान,तस्करी सुसाट | जत तहसील कार्यालय पुन्हा चर्चेचा विषय ; दोन दिवसात दलालांची संख्या वाढली

0
जत,संकेत टाइम्स : जत‌ तहसीलच्या एका विभागातील साहेबांचे वरदान लाभलेल्या कर्मचाऱ्यांचा थटथयाटचा दुसरा अध्याय समोर आला असून कोणतेही कारण नसताना त्या विभागामध्ये उमेदवार म्हणून काम करत असलेल्या हातावर पोट असणाऱ्या चार उमेदवारांना साहेबांच्या आदेशावरून काढून टाकत पोटावर मारण्याचा निंदनीय प्रकार जत तहसील कार्यालयात घडवून आणल्याची चर्चा आहे.मात्र हे करताना अन्य संकलन विभागातील कर्मचाऱ्यांच्या टेबलवर राजरोसपणे बसणारे उमेदवार साहेबांना दिसले नाहीत हे विशेष आहे.
जत तहसीलचा कारभार अंदळ दळतयं कुत्र पीट खातयं अशी झाली आहे.तब्बल सव्वा महिन्यानंतर तहसीलदार पदी विराजमान झालेल्या तहसीलदाराकडून मोठ्या बदलाची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.मात्र कार्यालयाला पडलेला दलालाचा विळखा दोन दिवसात आणखीन घट्ट झाल्याचे चित्र असून गेल्या दोन दिवसात कामासाठी येणाऱ्या नागरिकांपेक्षा दलालचं जास्त दिसत होते.

कार्यालयातील टेबलचा आकडा ठरला?

 

जत तहसील कार्यालयातील टेबल पुराण गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत आहे.मिळकत असणाऱ्या टेबलवर साहेबांचाही डोळा असल्याचे अनेकवेळा सिध्द झाले असून आताही प्रत्येक टेबलचा आकडा एका मध्यस्थी कर्मचाऱ्यांच्या पुढाकाराने ठरल्याची जोरदार चर्चा आहे.त्यामुळेच टेबलला जास्त रक्कम देणाऱ्या कर्मचाऱ्यांना साहेबांनी मुदत वाढ दिल्याचीही चर्चा आहे.

वाळू तस्करांच्या पंटरबरोबर बैठक ?
जत तालुक्यात बेधडक वाळू तस्करी जगजाहीर आहे.या तस्करीवर कारवाई करू नये म्हणून यापुर्वीपासून महसूलच्या अधिकाऱ्यांना मोठी मिळकतीमुळे वाळू  तस्करांवरांना वरदान दिले जात असल्याचे,  आरोप होत होते.आताही वाळू तस्करांचा एक पंटर,एक कर्मचारी व साहेबांच्या बरोबर झालेल्या बैठकीत मिळकतीची रक्कमही ठरविण्यात आल्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे.गेल्या दोन दिवसापासून वाळू तस्करी वाढल्याचे चित्र तालुक्यात आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.