जत येथील महिलेची आत्महत्या

0

 

जत : जत येथील छत्रीबाग रोडवरील कुलकर्णी पेट्रोल पंपासमोर राहणाऱ्या श्रीमती बेबीनंदा सुनिल माने (वय ४२) या महिलेने राहते घरी तुळीस दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना पहाटे पाच-साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.

 

 

तीन महिन्यापूर्वी त्यांच्या पतीचे ह्रदयविकाराच्या आजाराने निधन झाले होते. तेव्हापासून त्या नैराश्यात होत्या. मात्र आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात अमोल यरडोली यांनी वर्दी दिली आहे. तपास पोलीस नाईक बागडे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.