जूना देवनाळ रस्त्यावरील अपघातात मेंढिगिरीचा एकजणाचा मृत्यू

0
जत,संकेत टाइम्स : जत- विजापूर महामार्गावरील अमृत्तवाडी फाट्यानजिकच्या जून्या देवनाळ रस्त्यावर दुचाकी घसरून पडल्याने जखमी झालेले अनिल इरगोडा बिराजदार (वय ३५,रा.मेंढिगिरी)यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.ही घटना ता.२ संप्टेबर रोजी रात्री आठ वाजता घडली होती.रविवारी ता.३ ऑक्टोंबर रोजी जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मयताचा भाऊ सुनिल इरगोडा बिराजदार यांनी फिर्याद दिली आहे.

 

Rate Card
अधिक माहिती अशी,मेंढिगिरी येथील अनिल बिराजदार हे २ संप्टेबरला जून्या रेवनाळ रोडवरून (एमएच १०,डीएम ४२९५) ने चालले असताना अमृतवाडी फाट्यानजिक त्यांची दुचाकी घसरल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती.तेव्हापासून त्यांच्यावर सांगलीत उपचार सुरू होते.त्याचा उपचारा दरम्यान १५ संप्टेबर रोजी मुत्यू झाला होता.दरम्यान मयताचे भाऊ सुनिल इरगोडा बिराजदार यांनी रविवार ता.२ ऑक्टोंबरला जत पोलीसात फिर्याद दिली आहे.अधिक तपास हवलदार कणसे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.