बेवनूरमध्ये चार विद्युत मोटारीची चोरी

0

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात चोरीच्या घटना  दिवसेन् दिवस वाढत आहेत.घरफोडी,दुकान फोडी,दुचाकी,बँकेतून काढलेले पैसे पळविण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत. त्यात आता शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारीची भर पडली आहे. गेल्या चार दिवसात बेवनूर ता.जत येथील खरातवस्ती परिसरातील ४ मोटारी चोरट्यांनी लंपास‌ केल्या आहेत. जत पोलीसांची ढिलाई चोरट्यांना बळ देत असून तालुक्यात दररोज कुठेना कुठे चोरीची घटना घडत आहे.विशेष म्हणजे जत पोलीसाकडून यातील एकाही घटनेचा छडा लावलेला नाही.त्यामुळे तालुक्यात भितीचे वातावरण पसरले आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.